शॉकींग! अनुकंपावर नोकरी मिळविण्यासाठी भावानेचे केली २ सख्ख्या बहिणींची हत्या
By निखिल म्हात्रे | Published: October 23, 2023 02:47 PM2023-10-23T14:47:27+5:302023-10-23T14:48:15+5:30
गणेश मोहीते यांचे आपल्या दोन बहीणी व आई सोबत पटत नसे. यांच्यामध्ये सतत प्राॅपर्टी व अनुकंपाच्या नोकरीवरून वाद होत असत.
अलिबाग - अनुकंपावर नोकरी मिळविण्यासाठी उच्च शिक्षित भावाने दोन सख्या बहिणींना विषारी औषध देऊन त्यांची हत्या केली. याप्रकरणात आरोपी गणेश यांनी पोलिसांना चुकीची माहीती देऊन पोलिसांनी चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी विविध युक्त्या लढवून घटनेची सविस्त माहीती घेऊन अखेर आरोपी गणेशच्या हाता बेड्या ठोकल्या.
गणेश मोहीते यांचे आपल्या दोन बहीणी व आई सोबत पटत नसे. यांच्यामध्ये सतत प्राॅपर्टी व अनुकंपाच्या नोकरीवरून वाद होत असत. या गोष्टीचा मनात राग धरून गणेश ने डोक शांत ठेऊन आपल्या दोन्ही बहीनींना फिल्मी स्टाईलने संपवायचे असे ठरविले. त्यानुसार मागील रविवारी पिण्यासाठी सुप बनवून त्यामध्ये विषारी औषध टाकून दोन्ही बहीणींना गणेशने संपविले. गणेशने गुगलच्या माध्यमातून सर्च करून कोणत्या विषारी औषधाला जेवणातून वा पाण्यातून देताना वास येणार नाही याची खात्री करण्यासाठी साधारणता 53 वेळा गुगल वरून माहीती घेतली असल्याचे तपासात समोर आले असल्याची माहीती जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबाग तालक्यातील चौल येथील भोवाळे गावात जेवणातून विषबाधा झाली असल्याने सोनाली मोहिते (वय 34) व स्नेहल मोहिते (वय 30) या दोन बहिणींनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोनालीचा 16 आॅक्टोबर 2023 रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हि घटना रेवदंडा पोलिस ठाण्यात मिळाली असता आरोपी गणेश मोहिते याची फिर्याद घेवुन अकस्मात मृत्यू म्हणून दाखल करण्यात आला. सोनाली मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असता तिचा मृत्यु जेवणातील विषबाधेमुळे झाला असल्याचे समोर आले. तर दुसरी बहिण स्नेहल मोहिते (वय 30) हिला उलट्याचा त्रास होत असल्याने तिची प्रकृती गंभीर झाली होती. स्नेहलला पुढील उपचारासाठी एम.जी.एम रुग्णालय पनवेल येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. स्नेहलचा मृत्युपूर्व जबाब नोंद केला आहे.
याबाबात स्नेहल व तिची आई जयमाला मोहिते यांनी सांगीतले गणेशने सोनाली व स्नेहाला सूप दिल्यानंतर पाणी पिण्यासाठी तांब्या भरून घराबाहेर ठेवला होता. त्यावेळी भावकीतील नातेवाईक त्यांना मारण्याच्या उद्देशाने विष टाकले असावे त्यामुळेच तिच्या मुली मयत झाल्या असाव्यात असा संशय व्यक्त केला होता. कारण जयमाला मोहीते व त्यांच्या नातेवाईकांमध्ये बरेच वर्षापासून मालमत्तेच्या वादातून भांडण सुरु होते. या गोष्टीचा मनात राग धरून माझ्या मुलींबर विष प्रयोग झाला असल्याचे सांगितले. मात्र घटनास्थळी जाऊन प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता प्राॅपर्टी व अनुकंपाच्या नोकरी वरूनच गणेश याने आपल्या बहीणींना संपविले असल्याचे समोर आले. तसेच आरोपी गणेश मोहीते याने आपणच दोन्ही बहीणींना संपविले असल्याचा कबुली जबाब हि दिला असल्याचे अपर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.
या घटनेचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विशाल शिर्के, पोलीस उप निरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोलिस हवालदार प्रतिक सावंत, यांनी केला आहे.