धक्कादायक ! भोसकून खून केल्यानंतर जाळला मृतदेह; बाणेर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 18:09 IST2020-12-01T18:08:56+5:302020-12-01T18:09:47+5:30
ज्वलनशील पदार्थाने मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

धक्कादायक ! भोसकून खून केल्यानंतर जाळला मृतदेह; बाणेर येथील घटना
पिंपरी : एका इसमाचा भोसकून खून करून मृतदेह जाळल्याची घटना बेंगळुरू-मुंबई महामार्गाजवळ उघडकीस आली. संदीप पुंडलिक माईनकर (वय ५३) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. आशिष संदीप माईनकर (वय २८, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अज्ञात व्यक्तीने हत्याराने भोसकून संदीप माईनकर यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह बाणेर येथील उदनशाहवली दर्गा येथील कंपाऊंड आणि होर्डींगच्या मोकळ्या जागेत टाकला. त्यानंतर ज्वलनशील पदार्थाने मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
खून करून मृतदेह जाळल्याचे २९ नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता उघड झाले. मृताच्या खिशामध्ये एक मोबाईल क्रमांक सापडला होता. त्यावरून मृताची ओळख पटली. मृत संदीप माईनकर कोणताही कामधंदा करीत नव्हते. इकडे तिकडे भटकून भाजी मंडई अथवा इतर ठिकाणी झोपत असे. त्यांचा मुलगा हा चुलत्याकडे राहत असल्याचे हिंजवडी पोलिसांनी सांगितले.