धक्कादायक! ख्रिसमसनिमित्ताने दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने केला खून; संशयिताला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 08:11 PM2018-12-26T20:11:44+5:302018-12-26T20:13:18+5:30

मडगावच्या कदंब बसस्थानकाजवळील घटना

Shocking Christmas gift for not paying for alcohol; The suspect arrested | धक्कादायक! ख्रिसमसनिमित्ताने दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने केला खून; संशयिताला अटक

धक्कादायक! ख्रिसमसनिमित्ताने दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने केला खून; संशयिताला अटक

Next
ठळक मुद्देखून प्रकरणी ओमप्रकाश गणपत राय (38) याला फातोर्डा पोलिसांनी अटक कंदब बसस्थानकाजवळील हायसेंथ अर्पाटमेन्ट येथे ही घटना ही घडली. सीसीटिव्ही कॅमेरात संशयित राय याची छबी टिपली गेली होती. 

मडगाव - दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने रागाच्या भरात डोक्यावर दगड घालून खून करण्याची घटना गोव्यातील मडगाव शहरातील कंदब बसस्थानकाजवळ घडली. मंगळवारी उत्तररात्री खुनाची ही घटना घडली. मयताचे नाव शिवप्पा (40) असे असून, तो मूळ कर्नाटकातील बेळगाव जिल्हयातील गोकाक येथील रहिवाशी या खून प्रकरणी ओमप्रकाश गणपत राय (38) याला फातोर्डा पोलिसांनीअटक केली आहे. संशयित मूळ उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील मोहिआ या गावचा आहे. मयत व संशयित हे दोघेही भंगार गोळा करण्याचे काम करीत होती. संशयिताने खुनाची कबुली दिली आहे. उदया गुरुवारी त्याला पुढील तपासाकरिता रिमांडासाठी न्यायालयात उभे केले जाणार असल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आल्विटो रॉड्रगिस हे पुढील तपास करीत आहेत.

भारतीय दंड संहितेच्या 302 कलमाखाली संशयितावर गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली. काही दिवसांपूर्वी शिवप्पा याने राय याच्याकडून पन्नास रुपये घेतले होते. ती रक्कम त्याने परत केली नव्हती. मंगळवारी रात्री ख्रिसमसनिमित्त आपल्याला दारु प्यायची असून, पैसे देण्याची गळ  राय याने शिवप्पा याला घातली. शिवप्पाने त्यास नकार दिला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. नंतर दोघेही झोपी गेले. मध्यरात्री पावणोचारच्या दरम्यान राय हा झोपतून उठला यावेळी शिवप्पा हा निद्रावस्थेत होता. जवळ असलेल्या एक दगड उचलून त्याने झोपलेल्या शिवप्पावर हाणला व तो तेथून निघून गेला. कंदब बसस्थानकाजवळील हायसेंथ अर्पाटमेन्ट येथे ही घटना ही घडली.

काल सकाळी या अर्पाटमेन्टजवळ असलेल्या एका बारचे मालक संतोष गावकर यांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर फातोर्डा पोलिसांना कळविले. हायसेंथ अर्पाटमेन्टमध्ये बसविलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात संशयित राय याची छबी टिपली गेली होती. पोलिसांनी तपासकाम करताना भंगार गोळा करणाऱ्या काहीजणांना चौकशीसाठी ताब्यातही घेतले होते. राय यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर तपासाअंती त्याने गुन्हयाची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.

Web Title: Shocking Christmas gift for not paying for alcohol; The suspect arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.