धक्कादायक! परीक्षा केंद्रातून हरवली दहावीची उत्तरपत्रिका
By पूनम अपराज | Published: March 5, 2019 08:43 PM2019-03-05T20:43:18+5:302019-03-05T20:44:53+5:30
परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षक आणि परीक्षा केंद्र प्रमुखाने कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मुंबई - दहावीची बोर्डाची परीक्षा राज्यभरात सुरु झाल्या आहेत. मात्र, मुंबईतील कुर्ल्यात धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी दहावीचा मराठीचा पेपर होता. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्याने मराठीचा पेपर लिहिला. परंतु विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका गहाळ झाल्याने परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षक आणि परीक्षा केंद्र प्रमुखाने कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजुमन इस्लाम ही शाळा दहावीच्या बोर्डाची परीक्षेसाठी केंद्र आहे. दहावीच्या काही विद्यार्थ्यांना ही शाळा परीक्षेसाठी केंद्र आली असून शुक्रवारी मराठी विषयाची उत्तरपत्रिका ठरविल्याने परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षक आणि परीक्षा केंद्र प्रमुखाने कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावरून शाळेचा हलगर्जीपण समोर आला असून याप्रकरणी पोलीस तपास करणार आहेत. दोषी आढळणाऱ्या व्यक्तीस शिक्षा केली जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी सांगितली.