धक्कादायक! महिला पोलिसाची हत्या करून वर्गमित्राची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 09:42 AM2020-02-08T09:42:08+5:302020-02-08T09:44:58+5:30
ज्या पिस्तुलामधून महिलेवर गोळ्या झाडल्या, त्याच पिस्तुलातून आरोपीने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्याचे तपासातून समोर आले आहे.
नवी दिल्ली - महिला पोलीस सब इन्स्पेक्टरची हत्या करून तिच्या वर्गमित्रानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीतील रोहिणी परिसरात महिला सब इन्स्पेक्टरची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप पोलीस सब इन्स्पेक्टर असलेल्या दिपांशूवर ठेवण्यात आला होता. दरम्यान, त्यानेही आत्महत्या केली असून, त्याचा मृतदेह कर्नालमध्ये गाडीत सापडला. ज्या पिस्तुलामधून महिलेवर गोळ्या झाडल्या, त्याच पिस्तुलातून आरोपीने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्याचे तपासातून समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस सब इन्स्पेक्टर प्रीती अहलावत आणि दिपांशू हे 2018 मध्ये दिल्ली पोलीस दलात दाखल झाले होते. दोघेही एकाच वर्गात शिकले होते. आता दिपांशूने प्रीतीची गोळ्या झाडून हत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत.
दिल्लीतील रोहिणी परिसरात शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास पोलीस सब इन्स्पेक्टर प्रीती अहलावत यांची एका व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली होती. प्रीतीची दिल्लीतील पटपडगंज इंडस्ट्रियल एरियामध्ये नियुक्ती झाली होती. तिथे आपली ड्युटी संपवून ती पूर्व रोहिणी मेट्रो स्थानकातून चालत घरी निघाली होती. त्यावेळी वाटेतच पाठीमागून आलेल्या आरोपीने तिच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यातील दोन गोळ्या प्रीती हिला लागल्या. तर एक गोळी बाजूने जात असलेल्या कारच्या मागच्या काचेला लागली. दरम्यान प्रीतीचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.
धक्कादायक ! जामिनावर सुटून आराेपीचा महिलेवर बलात्काराचा प्रयत्न
खळबळजनक! अभिनेत्री मानसी नाईकची छेडछाड, तिघांविरोधात गुन्हा दाखल
लहान मुलांचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल
मसाज करायला गेला अन् सेक्स करण्यास नकार दिल्याने हाडं मोडून आला
प्रीतीवर हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. तर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तपास सुरू केला. तेव्हा मृत महिला ही पोलीस सब इन्स्पेक्टर असल्याचे समोर आले.