धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 01:57 PM2020-06-08T13:57:16+5:302020-06-08T14:00:12+5:30
तरुणाला त्याच्या वडिलांच्या जागी नोकरी मिळवायची होती आणि त्यासाठी त्याने आपल्या 55 वर्षांच्या वडिलांची हत्या केली. त्यासाठी त्याने त्याची आई आणि भावाची मदत घेतली.
तेलंगणामधून हृदयद्रावक प्रकरण समोर आलं आहे. येथे पीएसयूची नोकरी मिळवण्यासाठी चक्क एका तरूणाने वडिलांची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, या तरुणाला त्याच्या वडिलांच्या जागी नोकरी मिळवायची होती आणि त्यासाठी त्याने आपल्या 55 वर्षांच्या वडिलांची हत्या केली. त्यासाठी त्याने त्याची आई आणि भावाची मदत घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण घटनेत आरोपी तरुणाची आई आणि भाऊ यांनीही या तरूणाला हत्या करण्यास पाठिंबा दिल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित त्यावर कारवाई करण्यास सुरवात केली. आरोपींनी त्यासाठी आधीच संपूर्ण कट आखला होता. संपूर्ण गावात या तरूणाने सांगितले की, त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
25 वर्षांचा आरोपी हा पॉलिटेक्निक डिप्लोमा धारक आहे. 26 मे रोजी टॉवेलने वडिलांचा गळा आवळून खून केला. नंतर, त्या तरूणाने संपूर्ण गावाला सांगितले की, त्याच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, या हत्येत सहभागी असलेल्या दोन्ही तरुणांना अटक करण्यात आली आहे, तर त्यांची आई अद्याप बेपत्ता आहे.
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला
हत्येसाठी वापरलेले दोन मोबाइल फोन आणि टॉवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनुकंपा कारणास्तव नोकरी मिळण्यासाठी आई आणि मुलांनी अशा तीन जणांनी मिळून हा कट आखला. पेडपल्ली जिल्ह्यातील गोदावरीखानी येथील संगारेनी कोळशाच्या खाणीत या युवकाचे वडील पंप ऑपरेटर होते.
मोठ्या मुलाने रात्री वडिलांची हत्या केली आणि दुसर्या दिवशी कुटुंबाने सर्वांना सांगितले की, त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. काही लोकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना सांगण्यासाठी दबाव आणला, त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला आणि तपास सुरू केला.
पोलिसांनी भादंवि कलम ३०२, १२०-बी आणि ३४ अन्वये तक्रार दाखल केली आहे. संगारेनी कोळसा खाण राज्य आणि केंद्र सरकारबरोबर संलग्न काम करते आणि नोकरीदरम्यान एखाद्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्याला नोकरी दिली जाते.
तेलंगणा येथे पीएसयूची नोकरी मिळवण्यासाठी चक्क एका तरूणाने वडिलांची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, या तरुणाला त्याच्या वडिलांच्या जागी नोकरी मिळवायची होती आणि त्यासाठी त्याने आपल्या 55 वर्षांच्या वडिलांची हत्या केली. त्यासाठी त्याने त्याची आई आणि भावाची मदत घेतली.
— Lokmat (@MiLOKMAT) June 8, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या :
खूनप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत दाखल
३० वर्षांपूर्वी झाला होता कथित 'मृत्यू'; बँक फसवणुकीत CBIची तपासाची चक्रे फिरली अन् निघाला जिवंत
आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित