धक्कादायक! कोरोना संशयित तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 05:18 AM2020-07-30T05:18:41+5:302020-07-30T05:19:00+5:30

बडनेऱ्यात टेक्निशियनवर बलात्काराचा गुन्हा

Shocking! Corona swab took from the girls private part | धक्कादायक! कोरोना संशयित तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब

धक्कादायक! कोरोना संशयित तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा (जि. अमरावती) : कोरोना संक्रमित रूग्णाच्या संपर्कातील २४ वर्षीय तरुणीचा कोविड लॅबमध्ये गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बडनेरा पोलिसांनी मंगळवारी रात्री उशीरा बलात्कारासह विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. अल्पेश अशोक देशमुख (३०, रा. पुसदा, जि. अमरावती), असे आरोपीचे नाव असून तो बडनेºयाच्या लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून काम पाहतो.
फिर्यादी २४ वर्षीय तरुणी अमरावती येथे भावाकडे राहत असून एका मॉलमध्ये नोकरी करते. मॉलमधील कर्मचाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपर्कातील २० जणांचे २८ जुलैला ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये स्वॅब घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणाºया देशमुखने फिर्यादी मुलीला परत बोलावून तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तुम्हाला युरिनल तपासणी करावी लागेल, असे सांगितले. फिर्यादी तरुणीने सदर बाब वरिष्ठ महिला सहकाºयास कळविली. त्या दोघींनी महिला कर्मचारी नाही का, असे विचारले. त्यावर लॅब टेक्निशियनने महिला नसल्याचे सांगितले. तपासणी करण्यासाठी तुम्ही एका महिलेला सोबत घेऊ शकता, असे म्हटले. त्यानंतर टेक्निशियनने फिर्यादी तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणी केली. त्यानंतर टेक्निशियनने तुमची टेस्ट निगेटिव्ह असल्याचे सांगितले. योनीद्वारे घेतलेल्या स्वॅब तपासणीबाबत तरुणीस शंका आल्याने तिने त्याबाबत भावाला सांगितले. त्याने डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी अशाप्रकारे चाचणी करत नसल्याचे सांगितले. बडनेरा पोलिसांनी विविध कलमांसह अ‍ॅट्रॉसिटी, आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

अशाप्रकारे स्वॅब घेतला जात नाही. हा अत्याचार आहे. याप्रकरणी लॅब टेक्निशियनविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केलेली आहे. - शैलेश नवाल,
जिल्हाधिकारी, अमरावती

Web Title: Shocking! Corona swab took from the girls private part

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.