धक्कादायक! 'डॉक्टर डे'च्या दिवशीच डाॅक्टर दाम्पत्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 02:59 PM2021-07-01T14:59:23+5:302021-07-01T15:00:16+5:30

Doctor Husband and wife suicide : फोनवर भांडणे झाल्यावर पत्नीची आत्महत्या, नंतर पतीनेही घेतला गळफास वानवडीतील घटनेने खळबळ

Shocking! On the day of 'Doctor's Day', the young doctor strangled after his wife suicide | धक्कादायक! 'डॉक्टर डे'च्या दिवशीच डाॅक्टर दाम्पत्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

धक्कादायक! 'डॉक्टर डे'च्या दिवशीच डाॅक्टर दाम्पत्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देअंकिताने आत्महत्या केल्याने निखिलला मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्यानेही ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं.काल सायंकाळी निखिल घरी येत असतानाच त्याचा फोनवरुन पत्नी अंकिताशी भांडण झालं झाला. हे भांडण इतकं विकोपाला गेलं की दोघांनी आरडाओरड केला आणि अखेर अंकिताने फोन ठेवून दिला.

राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या दिवशीच वानवडीतील डॉक्टर दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वानवडी आझाद नगर परिसरात राहणार्‍या डॉक्टर पती, पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या खळबळजनक घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. निखिल शेंडकर आणि अंकिता शेंडकर असं आत्महत्या करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याचं नाव आहे. 

डॉक्टर निखिल आणि पत्नी अंकिता शेंडकर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले होते. हे दोघेही प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स होते. काल सायंकाळी निखिल घरी येत असतानाच त्याचा फोनवरुन पत्नी अंकिताशी भांडण झालं झाला. हे भांडण इतकं विकोपाला गेलं की दोघांनी आरडाओरड केला आणि अखेर अंकिताने फोन ठेवून दिला. निखिल हे घरी आल्यावर अंकिता दरवाजा उघडत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा डॉ. अंकिता शेंडकर यांनी घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यांनी रात्री आठ वाजता ही माहिती वानवडी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस त्यांच्या घरी पोहचले. त्यांनी अंकिता यांना खाली उतरवून ससून रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले. गळफास घेतल्याने मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह त्यांचा भाऊ ओमकार दत्तात्रय तळेकर (रा. उरुळी कांचन) यांच्या ताब्यात दिला.  

अंकिताने आत्महत्या केल्याने निखिलला मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्यानेही ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. मात्र आत्महत्या करण्याइतके टोकाचे पाऊल उचलण्याइतका कोणता मोठा वाद या दोघांमध्ये झाला? ते फोनवरुन क्की कोणत्या कारणावरून भांडत होते, हे अद्याप समजू शकले नाही. ही घटना आज सकाळी ७ वाजता उघडकीस आली. वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून तपास चालू आहे.

Read in English

Web Title: Shocking! On the day of 'Doctor's Day', the young doctor strangled after his wife suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.