शॉकिंग! बलात्काराचा केला सौदा, प्रकरण दाबण्यासाठी पंचायतीत ठरले पीडितेस ७० हजार देण्याचे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 03:02 PM2022-03-06T15:02:47+5:302022-03-06T15:03:13+5:30

Rape Case : पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेवर आणि तिच्या कुटुंबीयांवर तडजोडीसाठी दबाव आणला.

Shocking! Deal of rape, the panchayat directions to pay Rs 70,000 to the victim to suppress the case | शॉकिंग! बलात्काराचा केला सौदा, प्रकरण दाबण्यासाठी पंचायतीत ठरले पीडितेस ७० हजार देण्याचे

शॉकिंग! बलात्काराचा केला सौदा, प्रकरण दाबण्यासाठी पंचायतीत ठरले पीडितेस ७० हजार देण्याचे

googlenewsNext

 

पाटणा - बसनाही पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावात पंधरवडय़ापूर्वी एका मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव सरफराज असे आहे. त्याला शनिवारी दुपारी स्थानिक पोलिसांनीअटक केली. पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेवर आणि तिच्या कुटुंबीयांवर तडजोडीसाठी दबाव आणला.

"आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दबावामुळे, एका आठवड्यापूर्वी गावात एक पंचायत झाली, ज्यामध्ये सरपंच आणि मुखिया (गावप्रमुख) यांनी आरोपीला आर्थिक दंड ठोठावला. त्यांनी आरोपीला पीडितेला 70,000 रुपये देण्याचे निर्देश दिले," या प्रकरणाचे तपास अधिकारी जे.पी यांनी असे सांगितले.

हा धक्कादायक प्रकार एका सामाजिक संस्थेच्या लक्षात आला, त्यावेळी त्या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी पीडितेचे म्हणणे ऐकून बसनाही पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली.

क्राइम : पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचा 'सूड घेण्याचा प्लॅन', यूपीमध्ये लिहिली स्क्रिप्ट... मध्यप्रदेशात केली

बॉलीवुड : हिरोईनच्या पतीनेच केली होती तिची हत्या, मुलांवर गोळ्या झाडून स्वतः केली होती आत्महत्या

"पीडितेच्या लेखी तक्रारीनंतर आम्ही आरोपीला अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तडजोडीसाठी त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी पीडितेवर दबाव आणला होता," असंही तो पोलिसांना म्हणाला.

Web Title: Shocking! Deal of rape, the panchayat directions to pay Rs 70,000 to the victim to suppress the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.