धक्कादायक! इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून डॉक्टर महिलेची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 01:42 PM2018-11-27T13:42:48+5:302018-11-27T13:44:14+5:30

आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत डॉक्टर महिलेचे प्राजक्ता प्रणव कुलकर्णी असं नाव आहे. 

Shocking Doctor Mahatma committed suicide by jumping from the eighth floor of the building | धक्कादायक! इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून डॉक्टर महिलेची आत्महत्या 

धक्कादायक! इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून डॉक्टर महिलेची आत्महत्या 

ठळक मुद्देआज सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहेमृत डॉक्टर महिलेचे प्राजक्ता प्रणव कुलकर्णी असं नाव आहे. खडकपाडा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली

कल्याण - कल्याण येथील खडकपाडा परिसरात डॉक्टर महिलेने राहत्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत डॉक्टर महिलेचे प्राजक्ता प्रणव कुलकर्णी असं नाव आहे. 

खडकपाडा येथील महावीर हाईट्स या बारा माजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कुलकर्णी यांचे कुटुंब राहत होते. आज सकाळी प्राजक्ता यांनी सासू-सासऱ्यांना चहापान विचारले. त्यानंतर सासू - सासरे मॉर्निंग वॉल्कसाठी गेले. दरम्यान, प्राजक्ता यांनी आठव्या मजल्यावर जाऊन उडी मारून आत्महत्या केली. मृत डॉक्टर महिलेस एक पाच तर दुसरा दीड वर्षाचा मुलगा आहे. खडकपाडा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राजक्ता आणि प्रणव यांचा श्री क्लीनिक नावाचा दवाखाना खडकपाडा परिसरातच आहे. या आत्महत्येमागे कौटुंबिक वादाचे कारण असण्याची शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासात वर्तवली आहे.

  

Web Title: Shocking Doctor Mahatma committed suicide by jumping from the eighth floor of the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.