संतापजनक ! कोरोनाचे कारण देत बलात्कार पीडितेच्या तपासणीस डॉक्टरांचा नकार; इंदापूर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 07:27 PM2020-06-27T19:27:06+5:302020-06-27T19:30:50+5:30
१६ वर्षीय अल्पवयीन मुलीस गावातील २३ वर्षीय मुलाने लग्नाचे अमिष दाखवुन पळवून नेले होते.
इंदापूर : इंदापूर येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवुन तिचे राहते घरातुन पळवुन नेले. या मुलीवर वेळोवेळी बलात्कार झाल्याचे पोलीस चौकशीत निष्पन झाल्याने, इंदापूर पोलिसांनी पीडित मुलीस वैद्यकीय तपासणीसाठी इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र कोरोनाचे कारण देत उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीस नकार दिला. इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे यांनी आरोग्य विभागाकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे. कार्यालयाकडे तक्रार दाखल केल्याची माहिती दिली आहे.
१६ वर्षीय अल्पवयीन मुलीस गावातील २३ वर्षीय मुलाने लग्नाचे अमिष दाखवुन पळवून नेले होते. आरोपीस सोमवारी (दि.२२) अटक करण्यात आली व पीडित मुलीची त्याचे ताब्यातुन सुटका केली. बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये आरोपीवर गुन्हा दाखल करूण्यात आला. पीडित अल्पवयीन मुलीस इंदापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी अल्पवयीन बलात्कार पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यास कोरोनाचे कारण सांगुन नकार दिला. पोलिसांनी डॉक्टरांकडे विनंती केली की गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मुलीची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यावर डॉक्टरांनी ती मुलगी कोठे कोठे फिरून आली असेल, रूग्णालयात महिला डॉक्टर नाही. मी तपासणी करू शकत नाही, असे सांगितले.
याबाबत पोलिसांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांच्याकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात डॉ. शिरीष साळुंखे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असुन त्याचे स्पष्टीकरण मागीतले आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे डॉ. चंदनशिवे यांनी सांगितले.