धक्कादायक... लातुरात २२ कोटी ८८ लाखांचा अपहार, सरकारी निधी खासगी खात्यात

By राजकुमार जोंधळे | Published: January 23, 2023 12:04 AM2023-01-23T00:04:24+5:302023-01-23T00:05:03+5:30

शासकीय निधीची रक्कम खासगी खात्यात; चौघांविरुद्ध गुन्हा

Shocking... embezzlement of 22 crores 88 lakhs in Latur, government funds in private accounts | धक्कादायक... लातुरात २२ कोटी ८८ लाखांचा अपहार, सरकारी निधी खासगी खात्यात

धक्कादायक... लातुरात २२ कोटी ८८ लाखांचा अपहार, सरकारी निधी खासगी खात्यात

googlenewsNext

लातूर : शासकीय कार्यालयाशी संबंधित दोन बँक खात्यातील २२ कोटी ८७ लाख ६२ हजार २५ रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती रविवारी समोर आली. हा प्रकार २०१५ ते २०२२ असा एकूण सात वर्षांतील आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील एका तत्कालिन लिपिकासह चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, महसूल शाखेतील तत्कालिन लिपिक मनोज नागनाथ फुलेबोयणे यांच्याकडे बँक खात्याचा कारभार होता. दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निधी वितरणाचा आदेश होता. जलसंधारण अधिकाऱ्यांना दोन धनादेश देण्यात आले होते. ज्यामध्ये १२,२७,२९७ आणि ४१,०६,६१० रुपये आरटीजीएसद्वारे वितरित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शाखेत आरटीजीएस फॉर्म जमा करण्यात आले होते; परंतु खात्यात केवळ ९६ हजार ५५९ रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. यामुळे अपहार प्रकरणाचे धागेदोरे समोर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी खात्याचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश काढले. तसेच अन्य एका खात्याचेही लेखापरीक्षण करण्यात आले. ज्यामध्ये स्वाक्षरी व मूळ रकमेत बदल केल्याचे निदर्शनास आले. तसेच शासकीय रक्कम खासगी खात्यात वर्ग केल्याचे आढळून आले. 

याप्रकरणी तहसीलदार महेश मुकुंद परांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोज नागनाथ फुलेबाेयणे याच्याविरोधात स्वतःच्या आणि इतर तिघांच्या खात्यात रक्कम जमा करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अन्य तीन आरोपींमध्ये अरुण नागनाथ फुलेबोयणे, सुधीर रामराव देवकते, चंद्रकांत नारायण गोगडे यांची नावे आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक मिरकले करत आहेत.

Web Title: Shocking... embezzlement of 22 crores 88 lakhs in Latur, government funds in private accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.