धक्कादायक! महिला पोलिसाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 21:25 IST2019-11-24T21:23:37+5:302019-11-24T21:25:55+5:30
ही घटना रविवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास उघडकीस आली.

धक्कादायक! महिला पोलिसाची आत्महत्या
देहूरोड : तळेगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका २९ वर्षीय महिला पोलीस कर्मचा-याने राहत्या घरात पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची उघडकीस आले आहे. ही घटना रविवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
सरस्वती किसन वाघमारे (माहेरचे नाव , वय २९ रा. विकास नगर, देहूरोड) असे गळफास घेतलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. याप्रकरणी तिचे पती विकास पांडुरंग झोडगे ( वय ३५ ) यांनी फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात कार्यरत असणारी सरस्वती वाघमारे हे कार्तिकी वारीमुळे देहूगाव येथे बंदोबस्तास होती. शनिवारी (दि.२३) रात्रपाळी असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास ती घरी परतली होती. रविवारी (दि. २४) सकाळी सव्वा सातच्या सुमारास तिचे पती झोडगे यांना पंख्याला दोरीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत ती आढळून आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.