धक्कादायक! अमेरिकेमध्ये आठ महिन्यांच्या मुलीसह भारतीय वंशाच्या चार जणांचं अपहरण, पोलिसांनी दिली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 11:54 AM2022-10-04T11:54:07+5:302022-10-04T11:55:05+5:30

Crime News: अमेरिकेमधील कॅलिफोर्निया येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी भारतीय वंशाच्या चार जणांचं अपहरण करण्यात आलं आहे. यामध्ये एका ८ महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. ही घटना कॅलिफोर्नियामधील मर्स्ड कौंटीमध्ये घडली आहे.

Shocking! Four persons of Indian origin, including an eight-month-old girl, were kidnapped in America, the police informed | धक्कादायक! अमेरिकेमध्ये आठ महिन्यांच्या मुलीसह भारतीय वंशाच्या चार जणांचं अपहरण, पोलिसांनी दिली अशी माहिती

धक्कादायक! अमेरिकेमध्ये आठ महिन्यांच्या मुलीसह भारतीय वंशाच्या चार जणांचं अपहरण, पोलिसांनी दिली अशी माहिती

Next

वॉशिंग्टन - अमेरिकेमधील कॅलिफोर्निया येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी भारतीय वंशाच्या चार जणांचं अपहरण करण्यात आलं आहे. यामध्ये एका ८ महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. ही घटना कॅलिफोर्नियामधील मर्स्ड कौंटीमध्ये घडली आहे. एबीसी न्यूजने सोमवारी सांगितले की, २६ वर्षांचे जसदीप सिंग, जसलीन कौर त्यांची आठ महिन्यांची मुलगी अरुही आणि ३९ वर्षीय अमनदीप सिंह यांचं अपहरण करण्यात आलं. पोलिसांनी सांगितले की संशयित हे अत्यंत धोकादायक आणि हत्यारबंद आहेत.

या प्रकरणीचा तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने त्याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र ४ जणांचं जबरदस्तीने साऊथ हायवे ५९ च्या ८०० ब्लॉक येथून अपहरण करण्यात आलं. या कुटुंबाचं रिटेलर्स आणि रेस्टॉरंट्स आहेत, अशा भागातून अपहरण करण्यात आलं आहे.

अधिकाऱ्यांनी सध्यातरी अपहरणकर्त्यांचं नाव आणि त्यामागचा हेतू काय असावा याबाबत उलगडा केलेला नाही. सोमवारी पोलिसांनी सांगितले की, पीडितांपर्यंत किंवा संशयितांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून नका, असे आम्ही सातत्याने सांगत आहोत. त्यांच्याबाबत काही माहिती असल्यास ती ९११ क्रमांकावर पोलिसांना द्या.

यापूर्वी २०१९ मध्ये घडलेल्या अशाच एका घटनेत भारतीय वंशाचे व्यावसायिक तुषार अत्रे हे त्यांच्या गर्लफ्रेंडच्या कारमध्ये मृतावस्थेत सापडले होते. ते एका डिजिक मार्केटिंग कंपनीचे मालक होते. त्यांचे कॅलिफोर्नियामधील त्यांच्या आलिशान घरातून अपहरण करण्यात आले होते.  

Web Title: Shocking! Four persons of Indian origin, including an eight-month-old girl, were kidnapped in America, the police informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.