गँगरेप करून तोंडाला कापड बांधून मुलीला फेकले झुडपात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 10:07 PM2022-03-23T22:07:31+5:302022-03-23T22:08:35+5:30
Gangrape Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुटकन आणि बदकन या दोन भावांनी कानपूरमध्ये मुलीवर बलात्कार केला.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कानपूरमधील एका १४ वर्षीय मुलीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला आहे. ही अल्पवयीन मुलगी घराबाहेर जनावरांना चरवत असताना दोघांनी तिला पकडून तिचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुटकन आणि बदकन या दोन भावांनी कानपूरमध्ये मुलीवर बलात्कार केला. मुलगी काही तासांपासून बेपत्ता असल्याने पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत हरवलेल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संपूर्ण गाव मुलीला शोधू लागलं , पण ती कुठेच सापडली नाही. दरम्यान, दोरीनं बांधलेली आणि तोंडाला कापड बांधलेली मुलगी झुडपात बेशुद्धावस्थेत पडून असल्याची माहिती एका नातेवाईकाला मिळाली. नंतर कुटुंबीयांनी पोलिसांना ही माहिती दिली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक घटनास्थळी रवाना आलं. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा फरार असल्याची माहिती मिळत आहे.