धक्कादायक! आई, पत्नी, दोन मुलांची हत्या करून स्वतः घेतला गळफास लावून 

By पूनम अपराज | Published: November 17, 2020 07:37 PM2020-11-17T19:37:29+5:302020-11-17T19:38:25+5:30

Murder and Suicide : छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Shocking! He killed his mother, wife and two children and hanged himself | धक्कादायक! आई, पत्नी, दोन मुलांची हत्या करून स्वतः घेतला गळफास लावून 

धक्कादायक! आई, पत्नी, दोन मुलांची हत्या करून स्वतः घेतला गळफास लावून 

Next
ठळक मुद्देरायपूरचे एसएसपी अजय यादव यांनी सांगितले की, केंद्री गावात राहणाऱ्या कमलेश साहूने पत्नी, आई आणि दोन मुलांची हत्या केली. यानंतर त्याने स्वत: ला गळफास लावून घेतला.

रायपूरमध्ये सोमवारी रात्री एका युवकाने आपल्या आई, पत्नी आणि दोन मुलांची हत्या करुन स्वत: ला गळफास लावून घेतला. हे प्रकरण अभनपूरमधील केंद्री गावचे आहे. मंगळवारी सकाळी शेजार्‍यांनी या घटनेची माहिती दिली. या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, आजारामुळे कुटुंब काळजीत होते असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

रायपूरचे एसएसपी अजय यादव यांनी सांगितले की, केंद्री गावात राहणाऱ्या कमलेश साहूने पत्नी, आई आणि दोन मुलांची हत्या केली. यानंतर त्याने स्वत: ला गळफास लावून घेतला. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांना कमलेशचा मृतदेह लटकलेला असताना त्याची आई, पत्नी व दोन्ही मुलांचे मृतदेह जमिनीवर आढळले होते.

गावकऱ्यांनी कुटुंब आजाराने त्रस्त होते असल्याचे सांगितले 

एसएसपीच्या म्हणण्यानुसार ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, कुटुंबातील सदस्य कोणत्यातरी आजाराने त्रस्त झाले होते. हे घटनेमागील कारण असू शकते. मात्र, पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकलेले नाहीत.

गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले

छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, एकाच कुटुंबातील पाच लोकांचा मृत्यू होणे ही मोठी गोष्ट आहे. मी घटनेचे कारण लवकरात लवकर शोधण्यास सांगितले आहे.

Web Title: Shocking! He killed his mother, wife and two children and hanged himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.