भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार; दारु पिऊन झालेल्या वादात तरुणाचा खून, मृतदेह जाळला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 12:59 PM2021-08-03T12:59:45+5:302021-08-03T13:00:33+5:30

पार्टीत तरुणाचा खून करुन जाळण्याचा प्रयत्न, तुमसर तालुक्याच्या बघेडा येथील घटना

Shocking Incident in Bhandara, Murder of a young man in a drinking dispute, body burnt and ... | भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार; दारु पिऊन झालेल्या वादात तरुणाचा खून, मृतदेह जाळला अन्...

भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार; दारु पिऊन झालेल्या वादात तरुणाचा खून, मृतदेह जाळला अन्...

Next

भंडारा : पार्टीत मद्यप्रशन केल्यानंतर झालेल्या वादात लोखंडी राॅड व चाकूने भोसकून तरुणाचा खून करुन जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली. तुमसर तालुक्यातील बघेडा येथे मंगळवारी सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस. या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

अभिमन्यू अरविंद माने (२२) रा. आंबेडकर वार्ड, तुमसर असे मृताचे नाव. तो सोमवारी रात्री बघेडा येथे मित्राकडे पार्टीसाठी गेला होता. तेथे मद्यप्रशन केल्यानंतर वाद झाला. या वादात लोखंडी राॅड व चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर मृतदेह गावाजवळील नाल्यात फेकला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गोबरवाही पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल. कुलदीप डोंगरे या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याच घरी रात्री पार्टी होती. नागपूरचे चार मित्र या पार्टीत सहभागी असल्याची माहिती.

Web Title: Shocking Incident in Bhandara, Murder of a young man in a drinking dispute, body burnt and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस