उल्हासनगरात धक्कादायक प्रकार; सहा वर्षाच्या चिमुरडीवर बापलेकाचा अत्याचार, गुन्हा दाखल 

By सदानंद नाईक | Updated: January 23, 2025 00:00 IST2025-01-23T00:00:04+5:302025-01-23T00:00:27+5:30

Ulhasnagar Crime News: बुधवारी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने, मुलीला आईने बोलती केले असता सर्व प्रकार उघड झाला. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Shocking incident in Ulhasnagar; man and his son molested six-year-old girl, case registered | उल्हासनगरात धक्कादायक प्रकार; सहा वर्षाच्या चिमुरडीवर बापलेकाचा अत्याचार, गुन्हा दाखल 

उल्हासनगरात धक्कादायक प्रकार; सहा वर्षाच्या चिमुरडीवर बापलेकाचा अत्याचार, गुन्हा दाखल 

-  सदानंद नाईक
उल्हासनगर : शहर पश्चिम परिसरात राहणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुरडी मुलीवर शेजारी राहणाऱ्या बाप-लेकांनी अत्याचार केल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अल्पवयीन मुलगा व मुलाच्या बापालाअटक केली.

 उल्हासनगर कॅम्प नं-३, परिसरात राहणाऱ्या ६ वर्षाच्या मुलीची आई भांडीधुनी व वडील हातमजूरीचे काम करतात. आई-वडील कामाला गेल्यावर चॉकलेट दाखविण्याचे आमिष दाखवून शेजारी राहणारा १२ वर्षाचा अल्पवयीन मुलगा व त्याचा मजुरी करणारा बाप अत्याचार करीत असल्याचे उघड झाले. बुधवारी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने, मुलीला आईने बोलती केले असता सर्व प्रकार उघड झाला. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलगा व बापावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना पोलिसांनी अटक केली. अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत. दोन्ही बापलेकावर कठोर कारवाईची मागणी सर्वस्तरातून होऊ लागली आहे.

Web Title: Shocking incident in Ulhasnagar; man and his son molested six-year-old girl, case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.