भयंकर! उच्चशिक्षित जन्मदात्या आईनंच देवाच्या मूर्तीसमोर कापली ६ महिन्यांच्या चिमुकलीची मान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 07:01 PM2021-04-16T19:01:53+5:302021-04-16T19:24:11+5:30
Crime News : या महिलेच्या डिग्रीवरून दिसून येतं की, ती चांगली शिकलेली असताना एव्हढं टोकाचं, विचित्र पाऊल या महिलेनं उचललं. सध्या ती पोलिसाच्या नोकरीसाठी तयार करत होती.
बीएससी, बीएड शिकलेल्या एका महिलेनं देवाच्या मूर्तीसमोर आपल्या ६ महिन्यांच्या मुलीचा गळा चिरला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हीच महिला पोलिस बनण्यासाठी तयारीसुद्धा करत होती. ही धक्कादायक घटना तेलंगणातील सुर्यपेटा जिल्ह्यात घडली आहे. या महिलाचे नाव बी. भारती आहे. या महिलेच्या डिग्रीवरून दिसून येतं की, ती चांगली शिकलेली असताना एव्हढं टोकाचं, विचित्र पाऊल या महिलेनं उचललं. सध्या ती पोलिसाच्या नोकरीसाठी तयार करत होती.
८ वर्षांपूर्वी या महिलेचं लग्न महबूबादच्या नावाच्या एका माणसाशी झालं होतं. पण काही दिवसांपूर्वी त्यांचे लग्न मोडले. दोन वर्षांपासून ही महिला कृष्णा नावाच्या माणसासह संबंधात होती. त्यानंतर तिला एक मुलगी झाली. तिच्या अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीबाबत घरातील लोकांना आक्षेप होता. घरच्यांच्या छळामुळे मानसिक ताणात आल्यानं या महिलेनं युट्यूबवर आधात्मिक व्हिडीओ पाहायला सुरूवात केली.
कोविड नियमांचे उल्लंघन करीत बिर्याणीची विक्री करणाऱ्या कॅटरिंग चालकावर पोलिसांची कारवाई
गुरूवारी जेव्हा या महिलेचा पती कामासाठी सुर्यपेटा येथे गेला होता. त्यावेळी या महिलेनं देवाच्या मूर्तीसमोर आपल्या ६ महिन्यांची मुलगी रितूचा बळी दिला. जेव्हा घरातील इतर लोक परत आले आणि त्यांनी या चिमुकलीबद्दल विचारपूस केली तेव्हा ही महिला काहीही सांगायला तयार नव्हती.
२४ तासांत माज उतरवला! पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीनं मागितली जाहीर माफी
शोधशोध सुरू केल्यानंतर या मुलीची मान कापलेल्या अवस्थेत मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या महिलेला ताब्यात घेतलं आहे. आता या महिलेच्या मानसिक स्थितीची चाचणी केली जात आहे. या घटनेनंतर गावातील इतर लोकांना धक्का बसला आहे. पोलिस या घटनेचा पुढील तपास करून करत असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.