थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 08:48 PM2024-09-21T20:48:58+5:302024-09-21T20:51:19+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे दोन आठवड्यांपूर्वीच तुरणीची हत्या करण्यात आली आहे. तिची ओळखही पटली आहे...

Shocking incident Now another Shraddha Walker 30 pieces of 29-year-old girl body found in fridge in Bengaluru | थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

दिल्लीतील श्रद्धा वालकर प्रकरणाच्या आठवणी अद्यापही आपल्या स्मरणात असतील. यातच आता बेंगळुरूमधील मल्लेश्वरममधून एक अशीच घटना समोर आली आहे. येथे एका 29 वर्षीय तुरुणीच्या मृतदेहाचे 30 तुकडे करून ते फ्रीजरमध्ये ठेवल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी शनिवारी यासंदर्भात माहिती दिली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे दोन आठवड्यांपूर्वीच तुरणीची हत्या करण्यात आली आहे. तिची ओळख पटली असून तपासाच्या कारणास्तव अधिक माहिती शेअर करण्यात आलेली नाही. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती तीन महिन्यांपूर्वीच या फ्लॅटमध्ये बाड्याने राहण्यासाठी आली होती.

"तरुणीच्या हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले"  -
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. तरुणीच्या हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणीही संशयितांचा शोध सुरू आहे. महत्वाचे म्हणजे, या हत्येप्रकरणात तरुणीच्या परिचित व्यक्तीचा हात असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण ताजी झाली - 
या प्रकरणाने दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची आठवण ताजी झाली आहे. त्या प्रकरणात एका तरुणाने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते आणि ते जंगलात फेकून दिले होते. आता, बेंगळुरूमध्ये घडलेल्या या घटनाने समाजातील सुरक्षितता आणि महिलांवरील गुन्ह्यांसंदर्भात चिंता वाढवली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून आवश्यक माहिती मिळवली जात आहे.

Web Title: Shocking incident Now another Shraddha Walker 30 pieces of 29-year-old girl body found in fridge in Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.