ओला कार चालकाची कारमध्येच गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 04:05 PM2021-08-02T16:05:48+5:302021-08-02T16:06:36+5:30

Murder Case : याप्रकरणी रविवारी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा तपास सुरु केला आहे. 

The shocking incident of a OLA car driver being strangled to death in a car | ओला कार चालकाची कारमध्येच गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना

ओला कार चालकाची कारमध्येच गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना

googlenewsNext
ठळक मुद्देप्रभाकर गंजी (वय ४३ वर्ष, रा. कणेरी, भिवंडी ) असे हत्या झालेल्या ओला कार चालकाच नाव आहे.

भिवंडी - एका ओला कार चालकाची कारमध्येच अज्ञात आरोपीकडून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील मुबंई - नाशिक महामार्गावरील माणकोली नाका येथील पूला खाली घडली आहे. याप्रकरणी रविवारी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा तपास सुरु केला आहे. 

           

प्रभाकर गंजी (वय ४३ वर्ष, रा. कणेरी, भिवंडी ) असे हत्या झालेल्या ओला कार चालकाच नाव आहे. मयत प्रभाकर हा भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातील एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता. मात्र लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने कुटूंबाच्या उपजिवेकीसाठी ओला कारवर गेल्या एक ते दीड महिन्यापासून कार चालक म्हणून कार्यरत होता. त्यातच ३१ जुलै रोजी दुपारच्या सुमारापासून मृतक प्रभाकरची कार मुबंई - नाशिक मार्गावरील माणकोली नाक्यावरील पुलाखाली उभी होती. बराच वेळ झाला कारमध्ये चालक ड्रायव्हर सीटवर जागीच बसून होता, त्याची कोणतीही हालचाल होत नसल्याने काही स्थानिक नागरिकांना त्याचा संशय आला. त्यामुळे येथील कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी देण्यात दिल्याने पोलिसांनी कारजवळ जाऊन पहिले तर प्रभाकर मृत अवस्थेत दिसला. त्यांनतर स्थानिक नारपोली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनस्थळी दाखल होऊन पंचनामा करून प्रभाकराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.

           

मयत प्रभाकर यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारी वरून नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली असून मारेकरी पकडल्यानंतरच प्रभाकरच्या हत्येचे कारण समोर येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षिक (गुन्हे) राजेश वाघमारे  करीत आहेत. 

Web Title: The shocking incident of a OLA car driver being strangled to death in a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.