Shocking! पतीला पत्नीवर होता संशय, वॉशरूमचा दरवाजाही बंद करू देत नाही; चेक करत होता प्रायव्हेट पार्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 04:14 PM2021-08-05T16:14:22+5:302021-08-05T16:15:02+5:30
महिलेचा आरोप आहे की, तिचा पती बाथरूमचाही दरवाजा बंद करू देत नाही. इतकंच नाही तर तो तिचा प्रायव्हेट पार्टही चेक करत होता.
अमेरिकेत राहणाऱ्या एका नवविवाहित भारतीय महिलेने आपल्या पतीवर हिंसाचार केल्याचा आरोप लावला आहे. महिला न्यायासाठी भटकत आहे. महिला मुळची बिहारच्या पटणा येथील आहे आणि पतीसोबत यावर्षी मार्च महिन्यात अमेरिकेला गेली होती. महिलेचा आरोप आहे की, तिचा पती बाथरूमचाही दरवाजा बंद करू देत नाही. इतकंच नाही तर तो तिचा प्रायव्हेट पार्टही चेक करत होता. महिलेच्या पतीला संशय होता की, ती प्रेग्नेन्सी रोखण्यासाठी काही करते.
महिलेने भारतीय अॅम्बसीला दिलेल्या आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, पतीने तिला आर्थिक मदत न करतात भटकण्यासाठी सोडून दिलं आहे. इकडे जेव्हा महिलेच्या आई-वडिलांनी तिच्या सासऱ्यांना मदत मागितली तर त्यांनी मदत करण्याऐवजी हुंडा मागण्यास सुरूवात केली.
महिला अमेरिकन विदेश विभागासोबत बोलली तेव्हा तिला समजलं की, तिच्या पतीला F1 स्टुडंट व्हिसा मिळाला आहे. महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, तिचा पती तिला इतका त्रास देतो की १५ जून रोजी तिला घरी पोलिसांना बोलवावं लागलं. पोलिसांनी तिचा जीव वाचवला. स्थानिक पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (हे पण वाचा : Shocking! बाथटबमध्ये बुडवून गर्लफ्रेन्डची केली हत्या, कारण वाचून चक्रावून जाल...)
महिलेने तिच्या पतीवर आरोप लावले आहे की, तो तिला वॉशरूमचा दरवाजा उघडा ठेवण्यासाठी भाग पाडतो. त्याला संशय होता की, पत्नी प्रेग्नेन्सी रोखण्यासाठी काहीतरी उपाय करते. इतकंच नाही तर त्याने अनेकदा तिचा प्रायव्हेट पार्टही चेक केला, जेणेकरून हे कळावं की, पत्नी प्रेग्नेन्सी रोखण्यासाठी कोणत्या वस्तूचा वापर तर करत नाही ना.
पीडित महिला सध्या अमेरिकेत तिच्या एका नातेवाईकाच्या घरी राहते. महिलेने अनेक सामाजिक संघटनांसोबत काम केलं आहे. यातील काही संस्था अशा आहेत ज्या अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय महिलांसोबत होत असलेल्या अन्यायाला रोखण्यासाठी फंडींग देतात. (हे पण वाचा : सेक्स वर्करचं काम करून रोज कमावत होती ८८ हजार रूपये, आता सांगितलं Escort Life चं सत्य...)
दुसरीकडे महिलेच्या पतीने त्याच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप फेटाळून लावले. महिलेचा पती म्हणाला की, त्याला खोट्या आरोपांमध्ये अडकवलं जात आहे. जेव्हा महिलेच्या पतीला विचारण्यात आलं की, तो कोणत्या यूनिव्हर्सिटीचा स्टुडंट आहे तर त्याने फोन कट केला.