धक्कादायक! मजेसाठी जाळले मांजरीच्या पिल्लांना; तरुणाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 04:11 PM2019-05-03T16:11:26+5:302019-05-03T16:13:05+5:30

या सोसायटीत राहणाऱ्या सिद्धेश पटेल (३०) या निर्दयी तरुणाने हे कृत्य केले. 

Shocking kitten burned for fun; The youth is arrested | धक्कादायक! मजेसाठी जाळले मांजरीच्या पिल्लांना; तरुणाला अटक 

धक्कादायक! मजेसाठी जाळले मांजरीच्या पिल्लांना; तरुणाला अटक 

googlenewsNext
ठळक मुद्देमीरा रोड येथील भक्ती पार्क परिसरात अजमल रमा को - ऑप सोसायटी आहे.तरूणावर भा. दं. वि. कलम ४२९ आणि प्राणी संरक्षण कायद्यानुसार या प्रकरणात गुन्हा दाखल

मीरा रोड -  मीरा रोड परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तरूणाने आपल्या मजेत मांजरींच्या तीन लहान पिल्लांना जीवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि  तीन मांजरींच्या पिल्लांना आगीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मीरा रोड येथील भक्ती पार्क परिसरात अजमल रमा को - ऑप सोसायटी आहे. या सोसायटीत राहणाऱ्या सिद्धेश पटेल (३०) या निर्दयी तरुणाने हे कृत्य केले. 

जळालेल्या पिल्लांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यामधील एका पिल्लाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सिद्धेशविरोधात तेथील रहिवाशांनी गुन्हा दाखल केला. हा आरोप केल्यानंतर ठाणे ग्रामीण पोलिसांनी गुरूवारी या ३ वर्षीय तरूणाला अटक केली. नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलाश बर्वे यांनी आरोपी सिद्धेश पटेल या तरूणाने मजेसाठी मांजरींना जाळल्याचे समोर आले आहे. पटेल या तरूणावर भा. दं. वि. कलम ४२९ आणि प्राणी संरक्षण कायद्यानुसार या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती दिली. 

सिद्धेशच्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाश्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश दोन दिवसांपूर्वी मांजरींना जाळण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, सुदैवाने ती पळून गेली. ही संपुर्ण घटनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. त्या तरुणाने मजेकरिता मांजरींना पेटून दिले. मात्र, मांजरांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आगीतून पळ काढला.

 

Web Title: Shocking kitten burned for fun; The youth is arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.