धक्कादायक ! हळदीच्या साडीने गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 07:13 PM2020-05-30T19:13:59+5:302020-05-30T19:15:15+5:30

लग्नाच्या आदल्या दिवशी धक्कादायक घटना

Shocking! love birds commits suicide by hanging herself with a yellow haldi sari before marriage day | धक्कादायक ! हळदीच्या साडीने गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

धक्कादायक ! हळदीच्या साडीने गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

googlenewsNext

शिऊर : लग्नाच्या एक दिवस आधीच वधूने आपल्या प्रियकरासमवेत शेतातील लिंबाच्या झाडाला अंगावरील हळदीच्या साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना शनिवारी पहाटे वैजापूर तालुक्यातील कोल्ही येथे घडली. त्यामुळे कोल्ही परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सतीश अशोक पवार (२३) व पूजा रमेश पवार (२२), असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. या घटनेविषयी मिळालेली माहिती अशी की, पूजाचे लग्न सावळीवीर येथे जमले होते. हे लग्न रविवारी (दि.३१) सकाळी लागणार होते. त्यामुळे तीनदिवसीय हळदी सभारंभाचे आयोजन नवरी मुलीच्या घरी करण्यात आले होते. त्याकरिता नवरा मुलगाही आपल्या काही नातेवाईकांसह कोल्ही येथे आला होता. शुक्रवारी रात्री नववधू व वरास मोठ्या उत्साहात हळद लावण्यात आली. सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच शनिवारी पहाटेदरम्यान, या प्रेमीयुगुलाने शेत गट.क्र. १६३३ मध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाला अंगावरील हळदीच्या साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना उघडकीस आल्यानंतर शिऊर पोलीस ठाण्याचे सपोनि. सत्यजित ताईतवाले, पोहेकॉ. आर.आर. जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मयत प्रेमीयुगुलांचे मृतदेह शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उलटसुलट चर्चांना उधाण
पूजा व सतीश हे आंतरजातीय असल्याने त्यांच्या या प्रेम प्रकरणाला घरचा विरोध असल्याकारणाने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या दोघांचे प्रेमसंबंध होते तर हे दोघेही हळदीच्या आधीच पळून गेले असते. त्यांनी असे न करता आत्महत्या का केली, अशा उलटसुलट चर्चांना मात्र उधाण आले आहे.

आई-वडिलांना एकुलती एक मुलगी
सकाळी ही घटना नवऱ्या मुलास कळताच तो आपल्या नातेवाईकासह आपल्या घरी निघून गेला. पूजा ही आपल्या आई-वडिलांना एकुलती एक मुलगी होती. ती आपल्या कुटुंबासमवेत कोल्हीपासून दीड दोन कि.मी. अंतरावर नाईकवाडी येथे राहत होती, तर सतीश याची वस्तीही त्यांच्यापासून काही अंतरावर आहे. सतीश हा गेल्या दोन महिन्यांपूर्वीच लॉकडाऊनमुळे कोल्ही येथे आला होता. तो यापूर्वी कामानिमित्त शिर्डी येथे राहत असल्याची माहिती आहे.

Web Title: Shocking! love birds commits suicide by hanging herself with a yellow haldi sari before marriage day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.