धक्कादायक! बायकोने सरकारी नोकरी करू नये म्हणून हात कापला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 05:52 AM2022-06-08T05:52:27+5:302022-06-08T05:52:44+5:30

Man chops off wife’s right hand to block government job : शेर मोहम्मद असे आरोपी पतीचे नाव असून मनगटातून हात कापल्यानंतर त्याने पत्नीला स्वतः  रुग्णालयात भरती केले आणि नंतर फरार झाला.

Shocking! Man chops off wife’s right hand to block government job | धक्कादायक! बायकोने सरकारी नोकरी करू नये म्हणून हात कापला

धक्कादायक! बायकोने सरकारी नोकरी करू नये म्हणून हात कापला

Next

कोलकाता : पत्नीला सरकारी नोकरी करता येऊ नये यासाठी पतीने तिचा हात कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी पश्चिम बंगालमध्ये ही घटना घडली. शेर मोहम्मद असे आरोपी पतीचे नाव असून मनगटातून हात कापल्यानंतर त्याने पत्नीला स्वतः  रुग्णालयात भरती केले आणि नंतर फरार झाला. पीडित महिलेचे नाव रेणू खातून असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, शेर मोहम्मद पूर्व बर्दवान जिल्ह्यातील केतुग्राम येथील रहिवासी असून त्याने पत्नी रेणू खातूनचा उजवा हात मनगटातून कापला. क्रूर हल्ल्यानंतर तो स्वतःच पत्नीला स्थानिक रुग्णालयात घेऊन गेला. पण डॉक्टरांना हात पुन्हा जोडता येणार नाही याची त्याने पूर्ण काळजी घेतली होती. कारण, कापलेला काही भाग त्याने घरातच लपवून ठेवला. 

पत्नी सोडून देईल अशी भीती!
स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना सांगितले की, रेणू नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती आणि ती दुर्गापूर जवळच्या औद्योगिक नगरात एका खासगी रुग्णालयात सहायक म्हणून काम करत होती. नुकतेच तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये रुजू होण्यासाठी नियुक्ती पत्र मिळाले. पण त्यामुळे पती शेर अस्वस्थ झाला होता. तो स्वतः बेरोजगार होता, त्यामुळे सरकारी नोकरी मिळाल्याने पत्नी सोडून देईल अशी भीती त्याच्या मनात होती. यावरून दोघांमध्ये बऱ्याचदा वादही झाला, रेणूने ही नोकरी करू नये असे त्याचे म्हणणे होते. पण रेणूला नोकरी करायची होती. अखेर सोमवारी शेरने क्रूर कृत्य केले.

Web Title: Shocking! Man chops off wife’s right hand to block government job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.