Shocking! पत्नीला रोज देत होता ड्रग्स, अज्ञात लोक येऊन करत होते रेप; अन् पतीचा बनवत होता व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 05:42 PM2021-09-30T17:42:28+5:302021-09-30T17:48:23+5:30
ही घटना एविगनोन शहरातील आहे. इथे साधारण १ वर्ष चाललेल्या चौकशीनंतर एकूण ४५ संशयीतांची ओळख पटली. पतीला एका स्टोरमध्ये महिलांच्या स्कर्टखाली कॅमेरा ठेवून रेकॉर्ड करण्याच्या आरोपात पकडण्यात आलं होतं.
फ्रान्समध्ये ६८ वर्षीय एका व्यक्तीला गंभीर गुन्ह्यासाठी तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. ही व्यक्ती गेली १० वर्ष पत्नीला न सांगता तिला ड्रग्स देत होता. जेणेकरून अज्ञात लोक येऊन तिच्यावर रेप करू शकतील. ही घटना एविगनोन शहरातील आहे. इथे साधारण १ वर्ष चाललेल्या चौकशीनंतर एकूण ४५ संशयीतांची ओळख पटली. पतीला एका स्टोरमध्ये महिलांच्या स्कर्टखाली कॅमेरा ठेवून रेकॉर्ड करण्याच्या आरोपात पकडण्यात आलं होतं. त्यानंतर हे धक्कादायक प्रकरण समोर आलं. आरोपींमध्ये २४ पासून ते ७१ वर्षांच्या पुरूषांचाही समावेश आहे.
पोलीस कमिश्नर जर्मी बोस प्लेटियरे म्हणाले की, रेपच्या केसमध्ये इतके पुरावे मिळणं फारच दुर्मीळ असते. आमच्याकडे ती घटना सिद्ध करण्यासाठी सगळं काही होतं. पण व्यक्तीची पत्नी ड्रग्स घेतल्यावर बेशुद्ध होत होती आणि रेपनंतर तिला काहीच आठवत नव्हतं.
पतीकडे पत्नीच्या रेपचे अनेक व्हिडीओ आहेत. हे तो गेल्या एक दशकांपासून करतो आहे. वेगवेगळ्या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत वेगवेगळे लोक रेप करताना दिसत आहेत. महिलेचं वय आता ६० वर्षे आहे आणि पोलिसांनी तिला सतर्क केल्यावरच हे पूर्ण प्रकरण समोर आलं. सगळेच व्हिडीओ पतीच्या कॉम्प्युटरमध्ये आहेत. त्यासोबतच कॉम्प्युटरवरून काह डेटींग साइटही सर्च केल्या गेल्या आहेत. यावर तो पत्नीला ड्रग्स दिल्यावर लोकांना तिचा फायदा उचलण्यास सांगत होता.
पोलीस कमिश्नरांनी सांगितलं की, तिचा पती महिलेला निर्वस्त्र करून बेडवर झोपवत होता. नंतर रूम गरम करत होता जेणेकरून तिची झोप उघडू नये. त्यानंतर अज्ञात लोकांना तिच्यावर रेप करण्यास सांगत होता. महिला जराही जागी झाली तर ते तेथून पळून जात होते. सध्या पती आणि ३२ वर्षीय एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. आणि ९ पेक्षा जास्त लोकांची चौकशी सुरू आहे.