धक्कादायक; ट्रेनमधून उतरायला विसरली... आणि पुढे रिक्षा-स्कुटीवाल्यांनी केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 16:53 IST2020-02-28T16:48:42+5:302020-02-28T16:53:26+5:30
घडलेला प्रसंग तिने घरी सांगितल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

धक्कादायक; ट्रेनमधून उतरायला विसरली... आणि पुढे रिक्षा-स्कुटीवाल्यांनी केला बलात्कार
नवी मुंबई - एमआयडीसीच्या निर्मनुष्य परिसरात 19 फेब्रुवारीच्या रात्री एका वाट चुकलेल्या महिलेवर ८.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेळा बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका रिक्षाचालकासह स्कुटीवरील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पीडित १९ वर्षीय नवविवाहित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिन्ही आरोपींची उद्या पोलीस कोठडी संपत असल्याने कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी माहिती दिली.
१९ फेब्रुवारीला नाशिकहून मुंबईत आलेल्या पीडित महिलेची आपल्या नवऱ्यासोबत रेल्वे प्रवासात ताटातुट झाली होती. महिलेकडे मोबाईल देखील नव्हता. महिलेचा नवऱ्याने कुर्ला रेल्वे पोलिसांना याबाबत माहित दिली. नंतर महिला मुंब्रा स्थानकात उतरली. तिथे तिला एका भीक मागत असलेल्या महिलेने त्या महिलेकडे पैसे नसल्याने महापे येथे दागिने विकून पैसे देतो असं सांगून नेले. दरम्यान महापे येथे पोचल्यानंतर भीक मागणारी महिला स्वतःच्या घरी गेली. दागिने विकण्याचं काम झालंच नाही उलटपक्षी महिलेला एका रिक्षाचालकाने मदत करण्याच्या बहाण्याने एमआयडीसीच्या निर्जनस्थळी नेऊन महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर स्कुटीवरून जाणाऱ्या दोघांकडे तिने मदत मागितली असता त्यांनी देखील घणसोली हायवेनजीक असलेल्या झाडीत नेऊन बलात्कार केला. कशीबशी पीडित महिला घणसोली रेल्वे स्टेशनला पोचली. प्रवाशांच्या मदतीने ती आपल्या घरी नाशिक पोचली. त्यानंतर घडलेला प्रसंग तिने घरी सांगितल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
भिवंडीत गुंगीचे औषध देऊन तरुणीवर डॉक्टरचा बलात्कार
भाजप आमदारासह ७ जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा
महिलेच्या अंगावर जास्त दागिने नव्हते. केवळ ती रात्रीच्या वेळी नराधमांना वासनांच्या बळी पडली. पीडित महिलेच्या कानात सोन्याचे कानातले, पायात चांदीचे पैंजण, कानात सोन्याची चमकी होते. ते स्कुटीवरील नराधमांनी काढून घेतले होते. ते त्यांनी घरीच ठेवले होते. पोलिसांनी ते हस्तगत केले असल्याची माहिती गीते यांनी लोकमतशी बोलताना दिली.