धक्कादायक! बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री, एक लाखात ठरला व्यवहार; चौकडीला अटक

By मनीषा म्हात्रे | Published: January 21, 2023 04:57 AM2023-01-21T04:57:19+5:302023-01-21T05:00:26+5:30

पार्क साईट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेम्बर रोजी कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली १७ वर्षीय मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पार्क साईट पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.

Shocking Missing girl sold for marriage in Rajasthan, transaction settled for one lakh, four arrested | धक्कादायक! बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री, एक लाखात ठरला व्यवहार; चौकडीला अटक

धक्कादायक! बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री, एक लाखात ठरला व्यवहार; चौकडीला अटक

Next

मुंबई : कॉलेजसाठी बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचे गूढ उकलण्यास पार्क साईट पोलिसांना यश आले आहे. तिचे अपहरण करत एक लाखात राजस्थानमधील व्यक्तीसोबत तिचे लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार पार्क साईट पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आला आहे. याप्रकरणी पार्क साईट पोलिसांनी मुलीसोबत लग्न  करणाऱ्या व्यक्तींसह तिची विक्री करणाऱ्या चौकडीला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

पार्क साईट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेम्बर रोजी कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली १७ वर्षीय मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पार्क साईट पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.  हरविलेल्या मुलीचा मोबाईल बंद असल्याने तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. २३ डिसेम्बर रोजी हरविलेली मुलगी एक दादर रेल्वे स्टेशन येथे एक  पुरुष व महिलेसह दादर हुबळी एक्सप्रेस मध्ये चढताना दिसून आली. पोलिसांनी हाच धागा पकडून तपास सुरु केला. चौकशीत जोडप्याने मिरज चे तिकीट काढल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तात्काळ मिरज रेल्वे स्टेशन येथील सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासले. २४ डिसेम्बर रोजी मुलगी दोघांसोबत दुचाकीवरून जाताना दिसली. 

दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी तपास सुरु केला.  सदरची दुचाकी संबंधित व्यक्तीने  दादर रेल्वे स्टेशन येथुन लगेजद्वारे मिरजला नेल्याचे उघड झाले. दादर रेल्वे स्टेशन येथुन लगेजद्वारे पाठविलेल्या मोटार सायकलबाबत सविस्तर माहिती मिळताच, संबंधित व्यक्ती आणि त्याच्या सोबतची महिला  २२  तारखेला चेंबुर येथे तिच्या पतीला भेटण्यासाठी आल्याचे उघड झाले.

१६ जानेवारी रोजी पथक तिच्या पतीपर्यंत पोहचले. त्याच्याकडून मुलीसोबत असणारी महिला त्याची पत्नी सुनिता उर्फ सुधा मनोज जोशी (२४)  पत्नीचा मामा लडप्पा लक्ष्मण गोवी (३४) असल्याचे सांगितले. ते मूळचे कर्नाटकच्या हिरापुरचे रहिवासी आहे. त्यानुसार पथकाने कारवाई करत मुलीची सुटका केली. बळीत मुलीची विक्री करणाऱ्या, सुनिता , लडप्पा आणि गणपती हरिश्चंद्र कांबळे यांच्यासह तिच्याशी लग्न करणाऱ्याला बालविवाह प्रतिबंधक अधिनियम अन्वये कारवाई अटक करण्यात आली आहे. आरोपी २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत आहे.

औरंगाबादमधून मुलगी ताब्यात
सुनीता आणि तिच्या मामाने मुलीचे कर्नाटकच्या गणपती हरिश्चंद्र कांबळे (५०) यांच्या मार्फत राजस्थानच्या एका दुकानदारासोबत १ लाखाला विक्री करून लग्न लावून विक्री केल्याचे उघड झाले. त्यानुसार, पथकाने औरंगाबाद तसेच कर्नाटक येथे रवाना झाले. हरवलेली मुलगी आणि लग्न लावून दिलेला भावाराम पदमाराम माली यांना औरंगाबाद येथून ताब्यात घेऊन पथक मुंबईत आले.

या पथकाची कामगिरी
पार्कसाईट पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर तपस अधिकारी प्रमोद सानप, विकास पाटील आणि अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे.
 

Web Title: Shocking Missing girl sold for marriage in Rajasthan, transaction settled for one lakh, four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.