धक्कादायक! अंधेरी रेल्वे स्थानकावर महिलेचा विनयभंग; आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 06:36 PM2019-01-09T18:36:31+5:302019-01-09T18:45:38+5:30
तक्रारदार महिला अंधेरी येथे नोकरीला असून ती जोगेश्वरीवरुन आली होती. ही महिला बुकिंग ऑफीसमध्ये थांबलेली असताना आरोपी तिचे चित्रीकरण करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपी भूषण नाईकला अटक केली आहे.
मुंबई - अंधेरी रेल्वे स्थानकात मोबईलवरुन महिलेचे चित्रीकरण केल्याप्रकरणी विनयभंगाच्या आरोपाखाली एका ४० वर्षीय आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. काल सकाळी पावणेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार महिला अंधेरी येथे नोकरीला असून ती जोगेश्वरीवरुन आली होती. ही महिला बुकिंग ऑफीसमध्ये थांबलेली असताना आरोपी तिचे चित्रीकरण करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपी भूषण नाईकला अटक केली आहे.
आरोपी भूषण नाईक एका कोपऱ्यात उभा राहून त्याच्या मोबाईलचा कॅमेरा महिलेच्या दिशेने रोखला होता. भूषण आपले शूटिंग करत असल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी आरोपीला तात्काळ आरोपीला अटक केली. आरोपी भूषण नाईक बेरोजगार असून तो नालासोपारा येथे राहायला आहे. त्याच्या मोबाईलफोनमध्ये पोलिसांना तक्रारदार महिलेची व्हिडिओ क्लिप सापडली. कलम ३५४ अंतर्गत त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जुलै २०१७ मध्ये रेल्वे पोलिसांनी वांद्रे ते मालाड रेल्वे स्थानकादरम्यान दोन महिला प्रवाशांचे फोटो काढल्याप्रकरणी देखील एका बँकेत काम करणाऱ्याला अटक करण्यात आली होती.