धक्कादायक ! जुगारासाठी धर्मादाय आयुक्तांच्या नावाने उकळले पैसे 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 09:33 PM2019-02-04T21:33:49+5:302019-02-04T21:36:22+5:30

पोलिसांनी किशोरला अटक करत चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबूली देत फसवणुकीतील पैसे पत्नीकडे दिल्याचं सांगितलं. किशोरने जुगार खेळण्यासाठी ही फसवणूक केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

Shocking Money laundered for the name of charitable commissioner for gambling | धक्कादायक ! जुगारासाठी धर्मादाय आयुक्तांच्या नावाने उकळले पैसे 

धक्कादायक ! जुगारासाठी धर्मादाय आयुक्तांच्या नावाने उकळले पैसे 

googlenewsNext
ठळक मुद्देदादर परिसरात आगाशे रोडवर राहणारे तक्रारदार शेखर पाठारे यांची ‘नानाभाई फांऊडेशन’ नावाची एक सामाजिक संस्था आहे. २००४ पासून पाठारे हे या संस्थेवर विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत.अभ्यंकर नावाचे कुणीही सहाय्यक आयुक्त नसल्याची माहिती पाठारे यांना मिळाली आणि त्यांना धक्काच बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाठारे यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

मुंबई - जुगारासाठी पैसे नसल्यामुळे एका भामट्याने चक्क एका सामाजिक संस्थेकडून (एनजीओ) धर्मादाय सहाय्यक आयुक्तांच्या नावाने फोन करून पैसे उकळल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी किशोर आबाजी तांडेल (५२) याला अटक केली आहे. किशोरने जुगार खेळण्यासाठी पैसे नसल्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. न्यायालयाने किशोरला पोलिस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार पाठारे यांनी ज्या खात्यावर ही रक्कम पाठवली होती ते खाते ठाण्यातील एका नामांकीत बँकेचं असून ते खाते किशोर तांडेल यांच्या नावावर असल्याचं चौकशीत उघड झाले. पोलीस किशोरचा माग काढत सायन कोळीवाडा परिसरात पोहचले. त्यावेळी किशोर हा पत्नीसह पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी किशोरला अटक करत चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबूली देत फसवणुकीतील पैसे पत्नीकडे दिल्याचं सांगितलं. किशोरने जुगार खेळण्यासाठी ही फसवणूक केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

दादर परिसरात आगाशे रोडवर राहणारे तक्रारदार शेखर पाठारे यांची ‘नानाभाई फांऊडेशन’ नावाची एक सामाजिक संस्था आहे. २००४ पासून पाठारे हे या संस्थेवर विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. ही संस्था शिक्षणापासून वंचित आणि गरीब नागरिकांना आरोग्य उपचारासाठी आर्थिक मदत करते. २५ आॅक्टोबर २०१८ रोजी पाठारे यांच्या संस्थेतील कार्यालयात सहाय्यक धर्मादाय आयुक्त अभ्यंकर यांच्या नावाने फोन आला होता. त्यावेळी अभ्यंकर यांनी त्याच्या चालकाला किडनीवरील शस्त्रक्रियेनंतर औषध उपचारासाठी तातडीची २० हजार रुपयांची मदत हवी असल्याचं सांगितलं. त्यावेळी पाठारे यांनी मदत करण्याची तयारी दाखवत मदतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. अभ्यंकर यांनी सोमवारी म्हणजेच २९ आॅक्टोबर रोजी वरळी येथील कार्यालयातून सर्व कागदपत्रे देण्याचे आश्वासन दिलं. तसंच तात्काळ मदत पाहिजे असून कार्यालयातील कामामुळे सोमवारपर्यंत भेटताही येणार नसल्याचं सांगितलं.

पाठारे यांनी त्यांच्या ट्रस्टमधील कार्यकारिणी सदस्यांची परवानगी न घेता अभ्यंकर यांनी पाठवलेल्या खात्यावर १० हजार रुपये मदत म्हणून पाठवले. तसंच पैसे पाठवल्याचा मेसेजही अभ्यंकर यांच्या मोबाइलवर पाठवला. मात्र, पैसे मिळाले नसून पुन्हा अभ्यंकर यांनी पैसे पाठवण्यास सांगितले. त्यावेळी पाठारे यांना अभ्यंकर यांच्यावर संशय आल्याने पैसे पाठवण्यास नकार दिला. २९ आॅक्टोबर पाठारे यांनी वरळी येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात जाऊन चौकशी केली असता अभ्यंकर नावाचे कुणीही सहाय्यक आयुक्त नसल्याची माहिती पाठारे यांना मिळाली आणि त्यांना धक्काच बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाठारे यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Web Title: Shocking Money laundered for the name of charitable commissioner for gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.