धक्कादायक! मुलाने केली आई आणि मामाचा भाल्याने भोसकून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 03:03 PM2019-12-23T15:03:34+5:302019-12-23T15:06:41+5:30

चोरीचा आळ घेतल्याचा संशय; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

Shocking! Mother and mother's brother murdered by her child by spear | धक्कादायक! मुलाने केली आई आणि मामाचा भाल्याने भोसकून हत्या

धक्कादायक! मुलाने केली आई आणि मामाचा भाल्याने भोसकून हत्या

Next
ठळक मुद्देआई आशीबाई भोसले (वय ५५), मामा नमन्या हचल पवार (वय २८, रा. बोरकरवाडी, ता. फलटण) असे खून झालेल्यांची नावे आहेत.  लाकडी भाल्याने आशीबाई भोसले हिच्या गळ्यावर तर नमन्या पवार याच्या पोटात भोसकून त्यांना गंभीर जखमी केले.

सातारा - बोरकरवाडी, (ता. फलटण) येथे मुलाने आई आणि मामाचा भाल्याने भोसकून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री घडली. चोरीचा आळ घेतल्याच्या संशयातून ही भयानक घटना घडली आहे. आई आशीबाई भोसले (वय ५५), मामा नमन्या हचल पवार (वय २८, रा. बोरकरवाडी, ता. फलटण) असे खून झालेल्यांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोरकरवाडी येथे घराजवळ रात्री दहाच्या सुमारास आई आशीबाई आणि मामा नमन्या हे दोघे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्या ठिकाणी आशीबाई भोसले यांचा मुलगा गबऱ्या रमेश भोसले हा त्याचे साथीदार अरूण झबझब्या पवार, संपूबाई भोसले, चोच्या राज्या शिंदे, शबनम राजा शिंदे हे चारचाकी गाडीतून आले. ‘माझ्यावर चोरीचा आळ घेताय,’ असे म्हणत गबऱ्या भोसले याने त्याच्या हातातील लाकडी भाल्याने आशीबाई भोसले हिच्या गळ्यावर तर नमन्या पवार याच्या पोटात भोसकून त्यांना गंभीर जखमी केले.

या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या आशीबाई भोसले आणि नमन्या पवार यांना फलटण येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संशयित आरोपी गबऱ्या भोसले हा सुद्धा या वादावादीत जखमी झाला असून, तो फरार झाला आहे.  लोणंद पोलिसांनी दोन पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केली आहेत.

Web Title: Shocking! Mother and mother's brother murdered by her child by spear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.