धक्कादायक! मोबाईल वापरण्यापासून रोखल्यावर मुलाने केला हल्ला, आईचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 02:45 PM2023-10-14T14:45:39+5:302023-10-14T14:46:07+5:30
केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
केरळमध्ये मोबाईल वापरण्यास नकार दिल्याने मुलाने आईवर अमानुष हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. आपल्या मुलांना मोबाईल देऊन स्वतःच्या दुनियेत व्यस्त होणाऱ्या आपल्या सर्वांसाठी ही बातमी एक इशारा आहे. मोबाईल एखाद्या घातक ड्रगप्रमाणे मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम होत आहेत. आईच्या हत्येचा आरोप असलेल्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
हत्येचा आरोप ते थेट छोटा राजनशी कनेक्शन, बिग बॉसमध्ये एन्ट्री घेणार ही वादग्रस्त स्पर्धक
मिळालेल्या माहितीनुसार, कन्नूर जिल्ह्यातील कनिचिरा येथे राहणाऱ्या ६३ वर्षीय महिलेला रुग्मिणी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्मिनी यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महिलेचा मुलगा सुजित याला मोबाईलचे व्यसन आहे. या महिलेने त्याच्याकडे मोबाईलच्या वापराबद्दल विचारपूस करून फोन जास्त वापरू नकोस असे सांगितले होते. यामुळे महिलेचा मुलगा संतापला. त्याने त्याच्या आईवर अमानुष हल्ला केला, आईचे डोके पकडून भिंतीवर आपटले, त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली.
आरोपीने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली.त्यानंतर घरच्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी रुग्मिनीला तातडीने रुग्णालयात दाखल केले, तिथे महिलेवर उपचार सुरू करण्यात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. पोलिसांनी महिलेच्या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत महिलेच्या मुलाने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला एकदा मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने त्याच्या आईवर हल्ला केला कारण तिने त्याला सतत मोबाईल फोन वापरण्यापासून रोखले होते. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना एकदा कोझिकोडमधील कुथिरावट्टम येथील सरकारी मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बर्याच प्रमाणात स्मार्टफोन वापरण्याचे व्यसन वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू लागते. ऑफिस, कॉलेज किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात जात असताना अनेक वेळा लोक फोनवर व्यस्त राहतात, ज्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होतो. याशिवाय मोबाईलचे व्यसनही 'रिअल लाइफ'पासून दूर घेऊन जाते. कुणासोबत बसूनही काही लोक बोलण्याऐवजी फोनवरच व्यस्त राहतात. या कारणामुळे समोर बसलेल्या व्यक्तीवर त्याचा चांगला परिणाम होत नाही.