धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 07:21 PM2024-09-26T19:21:32+5:302024-09-26T19:21:48+5:30

माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.

Shocking! Mother-in-law dies in hospital; The son-in-law reached the bank with the dead body, demanded money... | धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...

धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...

UP Crime : 'मृताच्या टाळूवरचो लोणी खाणे', ही म्हण तुम्ही ऐकली असेल. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून अशाच प्रकारची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका खासगी रुग्णालयात वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या जावयाने जे कृत्य केले, ते ऐकून तुमचाही संताप होईल. या व्यक्तीने मृतदेह घरी नेण्याऐवजी थेट बँकेत नेला. कुठल्या बँकेत? तर त्या मृत महिलेचे खाते ज्या बँकेत होते, तिथे तिचा मृतदेह नेला आणि तिला जिवंत असल्याचे दाखवून तिच्या अकाउंटमधून सर्व पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला.

माणुसकीला लाजवणारी ही घटना ताडियावन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या प्रकरणाची माहिती देताना बँक मॅनेजरने सांगितले की, मृत महिलेचा जावई मृतदेह घेऊन बँकेत आला आणि सासू आजारी असल्याचे सांगून पैसे काढण्याची विनंती केली. त्याने पैसे काढण्यासाठी फॉर्मही भरला. पण, मॅनेजरला त्याच्यावर संशय आल्यामुळे तो महिलेच्या जवळ गेला. त्यावेली त्याला महिला जिवंत नसल्याचे आढळले. यानंतर त्याने पैसे देण्यास नकार दिला.

पैसे देण्यास नकार दिल्यामुळे जावयासह कुटुंबीयांनी मृतदेह बँकेत ठेवून गोंधळ घातला. यानंतर या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. या गोंधळानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. या संपूर्ण प्रकरणात आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Web Title: Shocking! Mother-in-law dies in hospital; The son-in-law reached the bank with the dead body, demanded money...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.