धक्कादायक! शौचालयात सापडले नवजात बालक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:36 PM2019-09-30T13:36:12+5:302019-09-30T13:45:06+5:30

या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.

Shocking! newborn baby found in public toilet | धक्कादायक! शौचालयात सापडले नवजात बालक

धक्कादायक! शौचालयात सापडले नवजात बालक

Next
ठळक मुद्दे या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.परिसरातील रुग्णालयाच्या मदतीने ते बाळाच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबई - कांदिवलीतील एका सार्वजनिक शौचालयात नवजात बालक मृत अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवलीच्या आकुर्ली रोड परिसरातील सर्वोदय वाडीत राहणारा आशिष सिंग (२०) हा साफसफाईचे काम करतो. शुक्रवारी सकाळी ६च्या सुमारास त्यांच्या आजी नैसर्गिक विधीसाठी शौचालयात गेल्या असता, त्यांना शौचालयात काहीतरी अडकल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ याबाबत सिंग यांना सांगितले. त्यानुसार, त्याने शौचालयाकडे धाव घेतली. तेव्हा त्यात नवजात बालक असल्याचे लक्षात आले. त्याने त्याला बाहेर काढत स्वच्छ केले. तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. हे पुरुष जातीचे असलेले हे बालक १० दिवसांचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील रुग्णालयाच्या मदतीने ते बाळाच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: Shocking! newborn baby found in public toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.