तुरूंगातून बाहेर येताच रॅपरवर गोळीबार, ६४ गोळ्या झाडल्यावर जागीच खेळ झाला खल्लास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 05:54 PM2021-07-13T17:54:43+5:302021-07-13T17:56:25+5:30
शिकागोतील एक रॅपर तुरूंगातून सुटला आणि काही अज्ञात लोकांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या लोकांनी त्याच्यावर ६४ गोळ्या झाडल्या.
अमेरिकेतून एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून सगळेच हैराण झाले आहेत. एखाद्या सिनेमाचा सीन असावा अशी ही घटना घडली. तर अनेकांचा या घटनेबाबत वाचून थरकाप उडाला. शिकागोतील एक रॅपर तुरूंगातून सुटला आणि काही अज्ञात लोकांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या लोकांनी त्याच्यावर ६४ गोळ्या झाडल्या.
न्यूयॉर्क पोस्टनुसार, Londre Sylvester शनिवारी कूक काउंटी तुरूंगातून रात्री ९ वाजता बाहेर येणार होता. तेव्हाच त्याच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हे लोक तिथेच पार्किंगमध्ये लपून बसले होते. शिकागो ट्रिब्यूननुसार, त्यांनी रॅपरवर ६४ गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
या गोळीबारात दोन लोक जखमी झालेत. एका ६० वर्षीय महिलेला काही जखमा झाल्या. ही महिल्या तिच्या कारकडे जात होती. तेव्हाच तिच्या गुडघ्यावर गोळी लागली. तेच तुरूंगात काम करणाऱ्या ३० वर्षीय महिला कर्मचारीलाही गोळी लागली. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
सिलवेस्टर जसा तुरूंगातून बाहेर आला तेव्हाच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तो घरी जाण्यासाठी बाहेर गाडीची वाट बघत होता आणि ब्रेसलेट घालत होता. तेव्हाच वेगवेगळ्या दिशेतून गोळीबार सुरू झाला. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजमधून पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.