धक्कादायक! ‘कॉन्टॅक्ट लिस्ट’मधील ओळखींच्यांना पाठविले ‘ती’ची न्युड छायाचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 07:31 AM2022-05-05T07:31:20+5:302022-05-05T07:31:34+5:30

रिंगरोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने ७ एप्रिल रोजी प्ले स्टोअरहून कॅश ॲडव्हान्स पाॅकीट नामक ॲप डाऊनलोड केले.

Shocking! Nude photos of her sent to acquaintances in the contact list due to not payment of loan | धक्कादायक! ‘कॉन्टॅक्ट लिस्ट’मधील ओळखींच्यांना पाठविले ‘ती’ची न्युड छायाचित्रे

धक्कादायक! ‘कॉन्टॅक्ट लिस्ट’मधील ओळखींच्यांना पाठविले ‘ती’ची न्युड छायाचित्रे

googlenewsNext

अमरावती: आठवड्यासाठी घेतलेले ऑनलाईन कर्ज विहित मुदतीत न भरल्याने एका महिलेच्या छायाचित्रांचे मार्फिंग करून ती ‘न्युड’ छायाचित्रे तिच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना पाठविल्याची धक्कादायक घटना वरूड येथे उघड झाली. ऑनलाईन कर्जाची परतफेड वेळेत न केल्याने कर्जदार महिलेच्या छायाचित्रात आक्षेपार्ह बदल करून ती सोशल व्हायरल करण्यात आली. विशेष म्हणजे, अशा प्रकारची शहर व जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे. त्याला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

१३ ते ३० एप्रिलदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी वरूड पोलिसांनी एका ३८ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून ३० एप्रिल रोजी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ५०० व आयटी ॲक्टच्या कलम ६६ ड, ६७, ६७ अ अन्वये गुन्हा दाखल केला. रिंगरोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने ७ एप्रिल रोजी प्ले स्टोअरहून कॅश ॲडव्हान्स पाॅकीट नामक ॲप डाऊनलोड केले. त्यातून सात दिवसांच्या मुदतीवर ३ हजार ५५९ रुपये ऑनलाईन कर्ज घेतले. कर्जावू घेतलेली रक्कम ती आठवड्याभराच्या आता भरू शकली नाही. दरम्यान, १३ एप्रिल रोजी तिला एक मोबाईल कॉल आला. त्या मोबाईलधारकाने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करून त्या महिलेने ३७९६ रुपये भरले. तरी देखील वेगवेगळ्या क्रमांकाहून रक्कम भरली नाही, म्हणून तिला वारंवार कॉल करण्यात आले.

...अन् तिला धक्काच बसला

आरोपीने ऑनलाईन कर्जाची प्रोसेस करून घेतानाच महिलेच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्ट चोरीने ‘कॉपी’ करून घेतली. त्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना महिलेचे मार्फ केलेले नग्न छायाचित्रे पाठविली. अगं, तुझी काही आक्षेपार्ह छायाचित्रे आम्हाला आलीत, असे एका परिचिताने सांगितल्यावर तिला धक्काच बसला. विशेष म्हणजे, ३५५९ रुपयांच्या कर्जाच्या मोबदल्यात १० हजार रुपये भरल्यानंतरही आरोपीने तिला त्रस्त करून सोडले आहे. आरोपीने आपले नग्न फोटो तयार करून आपली बदनामी केल्याची फिर्याद तिने नोंदविली.

काय आहे माॅर्फिंग?

मुळात फोटोंचे मॉर्फिंग करणे किंवा अशा प्रकारे मॉर्फिंग करून व्हिडिओ तयार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. सर्वसाधारणपणे सांगायचे झाले तर मॉर्फ करणे म्हणजे एडिट करून त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे. एखाद्याच्या फोटोवर दुसऱ्याचा चेहरा मॉर्फ केला जातो, याला फेस मॉर्फिंग असे म्हणतात. सध्या उपलब्ध असलेली विविध सॉफ्टवेअर्स आणि मोबाइल ॲपच्या साह्यानं असे मॉर्फिंग करणे सहज शक्य झालं आहे. सायबर मॉर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र बदलले जाते. महिलांची किंवा तरुणींची छायाचित्रे डाउनलोड करून, अवमानना होईल अशा प्रकाराने मॉर्फिंग करून ते पुन्हा वेबसाइट वा सोशल मीडियावर रिपोस्ट किंवा अपलोड केली जातात. त्यामुळे तरुणी आणि महिलांनी डीपी ठेवताना सजग राहण्याची गरज आहे.

Web Title: Shocking! Nude photos of her sent to acquaintances in the contact list due to not payment of loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.