धक्कादायक! सख्ख्या बहिणीचा नग्न व्हिडीओ प्रियकराला पाठवला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 09:23 PM2019-11-01T21:23:36+5:302019-11-01T21:28:29+5:30
याप्रकरणी तरुणीला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई - प्रेमात आंधळ्या झालेल्या तरुणीने आपल्या सख्ख्या धाकट्या २० वर्षीय बहिणीचा नग्न व्हिडीओ काढून आपल्या प्रियकराला पाठवला. याप्रकरणी तरुणीला आग्रीपाडा पोलिसांनीअटक केली आहे.
आरोपी २५ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासह भायखळा इथे राहते. तिचे गेल्या चार वर्षांपासून दिनेश नावाच्या त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या एका विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंध आहेत. दिनेशला तीन मुलंही आहेत. बुधवारी सकाळी दिनेशची पत्नी पतीच्या फोनमध्ये आरोपी तरुणीच्या बहिणीचे नग्न फोटो बघितल्याची तक्रार घेऊन तिच्या घरी गेली. ते फोटो दिनेशच्या मोबाईलवर आलेल्या एका न्यूड व्हिडीओतून स्क्रीनशॉट काढलेले होते.
हा अश्लील व्हिडीओ तुमच्या मुलीने त्याला पाठवल्याचा आरोप दिनेशच्या पत्नीने तरुणीच्या पालकांसमोर केला. या सगळ्या कृत्यास नकार देणाऱ्या आरोपी तरुणीने नंतर प्रकरण अंगाशी आल्यानंतर आपणच तो व्हिडीओ दिनेशला पाठवल्याचं कबूल केलं. आरोपी तरुणीने दिनेशच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. दिनेशने लग्नाचा प्रस्ताव स्वीकारण्याच्या बदल्यात तिच्याकडे तिच्या धाकड्या बहिणीचे नग्न फोटोंची मागणी केली होती. आरोपी तरुणीने प्रियकराची अट मान्य करत बहीण आंघोळ करत असताना दिनेशला व्हिडीओ कॉल केला. त्यामुळे तिचा व्हिडीओ दिनेशच्या मोबाईलवर सेव्ह झाला. या प्रकरणी तरुणीला अटक करण्यात आली आहे. दिनेश फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे अशी माहिती नवभारत टाइम्सने दिली आहे.