धक्कादायक! ऑनलाईन चालणारे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 04:49 PM2020-01-12T16:49:34+5:302020-01-12T17:02:58+5:30
दक्षिण मुंबईत दोन युवतींची सुटका
मुंबई - दक्षिण मुंबईत संकेतस्थळावरून ऑनलाइन वेश्या व्यवसाय चालविण्यात येणारे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी परिमंडळ-दोनचे उपायुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी पहाटे एका हॉटेलवर छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली. या प्रकरणी संगीता बारी (बदललेले नाव) या दलालाला अटक करण्यात आली आहे. बॉम्बे एस्कॉर्ट सर्व्हिस या वेबसाइटद्वारे संगीता ही गिऱ्हाईकांना ग्रॅण्ड रोड येथील एका हॉटेलमध्ये तरुणी पाठवित असे, असे पोलिसांनी सांगितले.
सोशल मीडियावरून आलेल्या जाहिरातीवर उपायुक्त जैन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित मोबाइलवर संपर्क साधला. त्याबाबत तोतया गिºहाइक पाठवून खातरजमा करण्यात आली असता, महिला एजंटने त्यांना रक्कम घेऊन ग्रॅण्ट रोड येथील हॉटेलवर बोलाविले. थोड्या वेळानंतर ती दोन तरुणींना घेऊन ती हॉटेलमध्ये पोहोचली. पोलिसांनी खातरजमा केली असता, वेश्या व्यवसाय चालवित असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, निरीक्षक पवार, उपनिरीक्षक विक्रम पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. दोन्ही युवती परप्रांतीय असून, त्यांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे.
पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘सेक्स रॅकेट’चा पदार्फाश, अभिनेत्रींना अटक