धक्कादायक! 943 परदेशी तबलिगी जमातींपैकी 197 जणांचे पासपोर्ट गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 11:09 PM2020-05-28T23:09:01+5:302020-05-28T23:11:46+5:30
मंगळवार-बुधवारी साकेत न्यायालयात दाखल केलेल्या 35 आरोपपत्रांमध्ये केवळ 296 पासपोर्ट आणि 375 आरोपींची ओळखपत्रे सादर केली गेली.
नवी दिल्ली - मरकज प्रकरणाची चौकशी करणाऱ्या दिल्लीपोलिसांच्या गुन्हे शाखेला ९४३ परदेशी जमातींपैकी १९७ पासपोर्ट मिळाले नाहीत. आतापर्यंतच्या तपासात परदेशी जमातींपैकी ७४६ जमातींनी त्यांचे पासपोर्ट किंवा ओळखपत्र तपास पथकाकडे सादर केले आहेत. त्यांच्याकडे 723 पासपोर्ट आहेत, तर 23 नेपाळी नागरिकांनी त्यांची ओळखपत्रे दिली आहेत. मंगळवार-बुधवारी साकेत न्यायालयात दाखल केलेल्या 35 आरोपपत्रांमध्ये केवळ 296 पासपोर्ट आणि 375 आरोपींची ओळखपत्रे सादर केली गेली.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान परदेशी जमातींनी सांगितले की, त्यांनी त्यांची सर्व कागदपत्रे कोठेतरी ठेवली आहेत. त्यांनी तपास अधिकाऱ्यांना माहिती दिलेली नाही. गुन्हे शाखेला त्याचा पासपोर्ट किंवा व्हिसा मिळू शकला नाही. मरकजमधील 34 देशांतून आलेल्या या जमातींना दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात अलग ठेवण्यात आले होते. त्यापैकी अनेक कोरोना पॉझिटिव्ह सापडले, त्यातील सहा जमातींचा मृत्यू झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पासपोर्ट किंवा व्हिसा नसलेल्या जमातींचे कागदपत्रे गहाळ केल्याच्या एफआयआर देखील दाखवता आला नाही . अशा प्रकरणात त्यांच्याविरूद्ध पासपोर्ट किंवा इमिग्रेशन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. मरकज आणि मौलाना साद यांच्या शामली येथील फार्म हाऊसवरही गुन्हे शाखेने छापा टाकला, तेथून काही विशेष काही माहिती मिळू शकली नाही. देशाच्या विविध भागात पसरलेल्या 2041 विदेशी जमाती मरकजमध्ये आल्याचा आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे.
Lockdown : डोंगरी पोलिसांनी बनावट पास बनवण्याऱ्या टोळीचा केला पर्दाफाश