धक्कादायक! पोलिसांच्या शस्त्रप्रदर्शनातून पिस्तूल गेली चोरीस  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 08:54 PM2019-01-04T20:54:42+5:302019-01-04T20:55:17+5:30

पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सायंकाळी शहरातील प्रमुख अधिकाऱ्यांची बंदव्दार बैठक घेत झाडाझडती घेतली.

Shocking Pistol robbery from police's weapon | धक्कादायक! पोलिसांच्या शस्त्रप्रदर्शनातून पिस्तूल गेली चोरीस  

धक्कादायक! पोलिसांच्या शस्त्रप्रदर्शनातून पिस्तूल गेली चोरीस  

Next

जळगाव : पोलीस दलाच्यावतीने आयोजित शस्त्रप्रदर्शनातून एक पिस्तूल चोरीस गेल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. प्रचंड  बंदोबस्त असताना हे पिस्तूल चोरीस गेल्याने पोलीस प्रशासन अक्षरश: हादरून गेले आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सायंकाळी शहरातील प्रमुख अधिकाऱ्यांची बंदव्दार बैठक घेत झाडाझडती घेतली. 

महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त जळगावातील काव्यरत्नावली चौकात शुक्रवारी पोलिसांच्यावतीने  शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. या ठिकाणी एके ४७ सह विविध प्रकारचे पिस्तूल, रायफल, गन अशी २० प्रकारची शस्त्रे ठेवण्यात आली होती. पाच टेबलांवर ही शस्त्रे मांडण्यात आली होती. प्रत्येक टेबलावर एक माहितगार कर्मचारी नियुक्त होताा. हा कर्मचारी शस्त्रांची माहिती देत होता.

दुपारी २.३० ते ३ वाजेच्या दरम्यान प्रदर्शनातील एका टेबलावर ठेवलेल्या  पाचपैकी  सहा राऊंडचे एक गायब असल्याचे लक्षात आले आणि एकच पळापळ सुरू झाली. हा प्रकार लक्षात येताच या ठिकाणी असलेल्या काही जणांना थांबवूनही ठेवण्यात आले होते. परिसरात नाकाबंदी करून सर्वांची कसून तपासणी करण्यात आली. यातून पोलीस कर्मचारीदेखील सुटले नाहीत.  

शहरात नाकाबंदी 

या घटनेनंतर सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले. विविध भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: Shocking Pistol robbery from police's weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.