धक्कादायक! पोलिसाच्या पत्नीची बोगस महिला पोलिसाने केली फसवणूक   

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 07:56 PM2019-04-09T19:56:06+5:302019-04-09T19:57:14+5:30

या महिलेने पोलीस हवालदाराच्या पत्नीशी फेसबुकवर मैत्री करुन ओळख वाढवली आणि त्यानंतर तिच्या घरात चोरी केली.

Shocking Police falsely accused policemen police | धक्कादायक! पोलिसाच्या पत्नीची बोगस महिला पोलिसाने केली फसवणूक   

धक्कादायक! पोलिसाच्या पत्नीची बोगस महिला पोलिसाने केली फसवणूक   

Next
ठळक मुद्देया महिलेने पोलीस हवालदाराच्या पत्नीशी फेसबुकवर मैत्री करुन ओळख वाढवली आणि त्यानंतर तिच्या घरात चोरी केली.याचाच फायदा घेत भक्तीने विदीशाच्या घरी चोरी केली अशी माहिती मानपाडा पोलिसांनी दिली.

ठाणे - मानपाडा पोलीसांनी एका ३३ वर्षीय बोगस महिला पोलिसाला चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. या अटक करण्यात आलेल्या बोगस महिला पोलिसाने पोलीस हवलादाराच्या पत्नीला स्वत: पोलीस असल्याचे सांगून तिच्या घरात चोरी केली. या महिलेने पोलीस हवालदाराच्या पत्नीशी फेसबुकवर मैत्री करुन ओळख वाढवली आणि त्यानंतर तिच्या घरात चोरी केली.

अटक करण्यात आलेल्या बोगस महिला पोलीस अधिकारी म्हणून वावरणाऱ्या आरोपीचं नाव भक्ती शिंदे असं आहे. भक्तीने फेसबुकवरुन  विदिशा  वाघ यांच्याशी मैत्री केली. विदीशा यांचे पती राजवर्धन वाघ हे घाटकोपर पोलीस स्थानकामध्ये हवालदार पदावर कर्तव्यावर आहेत. फेसबुकवरील चॅटनंतर अनेकदा भक्ती  विदिशाच्या घरी जात असे. याच भेटीदरम्यान भक्तीने  विदिशा  यांच्या घरातील मोबाइल आणि दागिने चोरल्याचे विदिशा यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी भक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी भक्तीला अटक केली असून तिची चौकशी केली जात आहे. माझ्या अनेक बड्या लोकांशी ओळखी असल्याचे भक्तीने विदिशा यांनी पोलिसांना माहिती दिली. तिने विदिशा यांना  त्यांच्याबरोबरचे फोटोही दाखवले आणि विश्वास संपादन केला भक्ती अनेकदा डोंबिवलीमधील राजकीय नेत्यांबद्दल बोलायची. त्यामुळे ती खरोखरच पोलीस असल्याचे विदिशा यांना वाटलं आणि त्या भक्तीच्या जाळ्यात अडकल्या अशी माहिती पोलिसांनी दिली. आपण थ्री स्टार ऑफिसर असल्याचे तिने विदिशा यांना सांगितले तसेच तिने पोलिसांचे ओळखपत्रही दाखवले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस असल्याचे सांगून ओळख वाढवल्यानंतर भक्तीचे विदिशा यांच्या घरी येणं - जाणं वाढले. खाजगी कारणांमुळे मला पोलीस दलातून काढून टाकण्यात आल्याचे सांगत भक्तीच्या विदिशाच्या घरच्या फेऱ्या वाढल्या. अचानक नोकरी गेल्यामुळे विदिशा यांना भक्तीबद्दल सहानभूती वाटू लागली. याचाच फायदा घेत भक्तीने विदीशाच्या घरी चोरी केली अशी माहिती मानपाडा पोलिसांनी दिली.

३ एप्रिलला भक्ती विदिशा यांच्या घरी आली होती. त्यावेळी भक्तीला घरात थांबायला सांगून मी किराणामाल घेण्यासाठी जवळच्या दुकानामध्ये गेले. थोड्या वेळाने भक्तीने माझ्या मुलीला मला बोलवून आण असं सांगत दुकानात पाठवले. या वेळी घरी कोणीच नसल्याची संधी साधून माझा मोबाइल आणि लाखो रुपये किंमतीचे  सोन्याचे दागिने घेऊन माझ्या घरातून पळ काढला याबाबत विदिशा यांनी पोलीस तक्रार दाखल केली. विदिशा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भक्तीला अटक केली आहे. अटक केल्यानंतर भक्तीकडे पोलिसांचे खोटे ओळखपत्र सापडले. अशाप्रकारे भक्तीने याआधीही लोकांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. भक्तीने पोलीस असल्याचे सांगून तिनदा लग्न केले आहे. तिच्या तिसऱ्या पतीने तिच्याविरोधात कोपरखैराणे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याची माहितीही समोर आली असल्याचे मानपाडा पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Web Title: Shocking Police falsely accused policemen police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.