धक्कादायक! पोलिस अधिकाऱ्याने पत्नी, मुलाची केली हत्या, सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने ६ गोळ्या झाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 05:55 PM2023-04-04T17:55:14+5:302023-04-04T17:56:16+5:30

पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Shocking! Police officer killed wife, son, shot 6 bullets with service revolver | धक्कादायक! पोलिस अधिकाऱ्याने पत्नी, मुलाची केली हत्या, सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने ६ गोळ्या झाडल्या

धक्कादायक! पोलिस अधिकाऱ्याने पत्नी, मुलाची केली हत्या, सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने ६ गोळ्या झाडल्या

googlenewsNext

पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुदासपूरमध्ये पंजाबपोलिसांच्या एका एएसआय अधिकाऱ्याने पत्नी आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या केली. पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर त्याने आपल्या पाळीव कुत्र्यालाही मारले. घटनेनंतर आरोपी एएसआय फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे.  पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

माझ्याकडे पण वर्दी आहे म्हणत महिला पोलिसाची पकडली कॉलर, फुगेवाडी चौकातील घटना

ही हृदयद्रावक घटना पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील आहे. ४८ वर्षीय पंजाब पोलिस एएसआय भूपिंदर सिंग यांनी गुरुदासपूरच्या भुंबली गावात त्यांची ४० वर्षीय पत्नी बलजीत कौर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं वृत्त आहे. त्‍यासोबतच आरोपीने त्‍याचा १९ वर्षांचा मुलगा बलप्रीत सिंह याच्यावरही गोळ्या झाडल्या आहेत. एएसआयने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने पत्नीला ३ आणि मुलाला ६ गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यादरम्यान आरोपीने घरात असलेल्या पाळीव श्वानावरही गोळी झाडली यात त्या श्वानाचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती गावातील लोकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आई आणि मुलाचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले. आरोपी एएसआय भूपिंदर सिंग सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 'पत्नी, मुलगा आणि कुत्र्याची हत्या केल्यानंतर आरोपी एएसआय घटनास्थळावरून पळून गेला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Shocking! Police officer killed wife, son, shot 6 bullets with service revolver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.