धक्कादायक! कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कोयत्याने हल्ला, तरुण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 10:53 AM2021-12-07T10:53:24+5:302021-12-07T10:53:48+5:30
Crime News: घरगुती वादात समुपदेशनासाठी गेलेल्या पोलिसांवर एका तरुणाने लोखंडी कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली.
लाखांदूर (भंडारा) : घरगुती वादात समुपदेशनासाठी गेलेल्या पोलिसांवर एका तरुणाने लोखंडी कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली.
विशाल मनोहर तुमाने (३८) रा. विरली बुज. से अटकेतील तरणाचे नाव आहे. पोलीस सुत्रानुसार, तालुक्यातील विरली(बु) येथील बावला हरिदास मोटघरे या वृद्धेने घरगुती वादावरून मुलगा व सुन मारहाण करीत असल्याची माहिती ११२ क्रमांकावर लाखांदूर पोलिसांना दिली. त्यावरुन आपातकालीन पोलीस वाहनासह पोलीस अंमलदार रवींद्र मडावी व सुभाष शहारे घटनास्थाळी दाखल झाले. वृद्धेच्या कुटुंबियांचे समुपदेशन आटोपून पोलीस वाहनाकडे जात होते. यावेळी विशाल दोन्ही हातात लोखंडी कोयता व चाकू घेवून गावातीलच अन्य एका व्यक्तीला शिविगाळ करुन खून करण्याची धमकी देत होता.
पोलिसांना आढळून आला. त्यावरुन पोलीसांनी आरोपीला हटकले असता पोलिसांना शिवागळ व धक्काबुक्की करत हातातील कोयत्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ही माहिती वरिष्ठांना महिती दिली. लाखांदूरचे पोलीस निरिक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे, पोलीस नाईक दिलीप भोयर, अंमलदार अनिल राठोड, अविनाश खरोले, मुलगिर, भुपेंद्र बावनकूळे आदी पोलिस अधिकारी कर्मचा-यांनी घटनास्थाळी जावून विशालला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र खुनी त्याने पोलिसांच्या अंगावर धावून जात शिविगाळ व धक्काबुक्की केली. यावेळी पोलिसांनी शिताफीने त्याच्या हातातील लोखंडी हत्यार हस्तगत करीत ताब्यात घेतले. घटनेची माहिती होताच पवनीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. घटनेची माहिती जाणुन घेतली.