धक्कादायक! शिक्षकाकडे सापडले जुन्या नोटांचे घबाड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 06:36 PM2020-02-11T18:36:50+5:302020-02-11T18:37:58+5:30
भारतीय चलनातून रद्द झालेल्या २३ लाखांच्या नोटा पोलिसांनी केल्या जप्त
ठाणे - भारतीय चलनातून रिझर्व बँकेने रद्द केलेल्या एक हजार रुपये मूल्याच्या 2300 अर्थात 23 लाखांच्या नोटा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने शनिवारी हस्तगत केल्या आहेत. फिरोज अन्सारी (45, रा. साकीनाका, मुंबई) या शिक्षकाकडून या नोटा हस्तगत करण्यात आल्या असून त्याची याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.
भारतीय चलनातून रद्द झालेल्या एक हजार रुपये दराच्या चलनी नोटा बदली करुन घेण्यासाठी काहीजण 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील कोरम मॉल जवळील सेवा रस्त्यावर येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविराज कु:हाडे, संदीप बागुल, उपनिरीक्षक सरक, कैलास सोनवणो, पोलीस हवालदार सुनिल जाधव, प्रकाश कदम आणि पोलीस नाईक अमोल देसाई आदींच्या पथकाने या मॉलच्या समोरील रस्त्यावर सापळा रचून अन्सारीला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये भारतीय चलनातून रद्द झालेल्या 23 लाखांच्या एक हजार रुपये दराच्या दोन हजार 300 नोटा हस्तगत करण्यात आल्या. केंद्र सरकारने नोटबंदी केल्यानंतर दिलेल्या मुदतीमध्ये त्या बदलून न घेता तसेच या नोटा चलनात आणणो हे बेकायदेशीर आहे, हे माहित असूनही त्यांनी त्याचा बेकायदेशीररित्या साठा केला. अन्सारी याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक सरक याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
'जे डब्ल्यु मेरियट' हॉटेलच्या बाऊन्सर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
अनैतिक संबंध जपण्यासाठी पतीने केली पत्नी अन् चिमुकल्या मुलीची हत्या
15 लाखांमध्ये नोटांची बदली
एक हजारांच्या 23 लाखांच्या या जुन्या नोटा खासगी क्लासेस घेणारा हा शिक्षक 15 लाखांमध्ये एका व्यक्तीला देण्याच्या तयारीत होता. आता या नोटा कशा आल्या आणि त्या कोणाला दिल्या जाणार होत्या? याचाही सखोल तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.