धक्कादायक! ४५ वर्षीय महिलेविरोधात पॉक्सोचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 02:06 PM2019-01-07T14:06:16+5:302019-01-07T14:15:32+5:30
पीडित मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. मात्र, पुराव्यांसाठी त्याच्या वैद्यकीय तपासणीबाबत निर्णय घेतला जाईल असे देखील अणावकर यांनी सांगितले.
मुंबई - वांद्रे परिसरात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका १२ वर्षीय मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेला वांद्रे पोलिसांनी अटक करण्यात केली आहे. शनिवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. रविवारी आरोपी महिलेला वांद्रे पोलिसांनीअटक केली. न्यायालयाने तिला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज पोलीस कोठडी संपत असून पुन्हा न्यायालयात तिला हजर केले जाईल अशी माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश अणावकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. पीडित मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. मात्र, पुराव्यांसाठी त्याच्या वैद्यकीय तपासणीबाबत निर्णय घेतला जाईल असे देखील अणावकर यांनी सांगितले.
या घटनेबाबत अणावकर यांनी सांगितले की, पीडित मुलाला दोन लहान भावंडं आहेत. त्याच्या आई - वडिलांचा घटस्फोट झालेला आहे. १२ वर्षीय पीडित मुलगा वडिलांसोबत खार येथे राहतो तर इतर दोन भावंडं वांद्रे येथे आईसोबत राहतात. आई - वडिलांचा घटस्फोट झालेला असला तरी भावंडांत दरी निर्माण न होऊ देण्याचं पालकांनी ठरवलं होतं. त्याप्रमाणे पीडित मुलगा आपल्या लहान भावंडांना भेटायला वांद्रे येथील आईच्या घरी येत जात असे. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या महिलेला मुलगा ओळखत होता.शनिवारी पीडित मुलगा आईकडे वांद्रे येथे आला असताना शेजारी राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेने त्याला आपल्या घरी बोलावले आणि त्याचा लैंगिक छळ केला. मुलाचे वडिल जेव्हा त्याला घरी घेऊन जाण्यासाठी आले त्यावेळी त्यांना मुलगा निराश दिसला. त्यांनी मुलाला निराशेचे कारण विचारले तेव्हा तो काही बोलला नाही. विश्वासात घेऊन विचारल्यानंतर मुलाने सर्व घडलेला प्रकार सांगितले. महिलेने तिच्या घरात असताना आपला लैंगिक छळ केला व याबद्दल कुठे बोलू नकोस असे बजावल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. आम्ही मुलाचा जबाब नोंदवला आहे. पॉक्सो कायद्यातंर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती अणावकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
वांद्रे परिसरात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका १२ वर्षीय मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेला वांद्रे पोलिसांनी अटक करण्यात केली आहे.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 7, 2019