धक्कादायक! खाजगी शाळेचा प्रताप; स्पेलिंग न आल्याने शिक्षकाने दिला चिमुकल्याला चोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 06:23 PM2019-06-28T18:23:07+5:302019-06-28T18:26:42+5:30
या प्रकरणी संबंधीत शिक्षकाच्याविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ - अंबनराथ येथील एका खाजगी क्लासेसच्या शिक्षकाने एका पाच वर्षाच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला स्टीलच्या पट्टीने जबर चोप दिला. त्या विद्यार्थ्याची एकच चुक होती की त्याला इंग्लिशमधील स्पेलिंग आली नाही. त्याच्या या लहान चुकीचा भरुदड शिक्षकाने जबर दिला. या शिक्षकाच्या मारहाणीमुळे त्या विद्यार्थ्याच्या संपूर्ण अंगावर चट्टे आले आहेत. या प्रकरणी संबंधीत शिक्षकाच्याविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ ग्रीन सिटी परिसरात राहणारा विनित तारी हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सिनियर केजी वर्गात शिकत आहे. तो राहुल इस्टेट येथील युरो किड्समध्ये शिकवणीला जात होता. २४ जून रोजी निनित याला शिकवणीतमध्ये नितेश प्रधान या शिक्षकाने इंग्रजीमधील स्पेलींग विचारली. ती स्पेलींग सांगता न आल्याने शिक्षकाने त्याल स्टीलच्या बट्टीने मारले. हा मार येवढा भयाण होता की त्याच्या संपूर्ण अंगावर लाल चट्टे तयार झाले. मारहाण केली जात असतांना विनित प्रचंड रडत असतांनाही त्याचा मार कमी झाला नाही. हात, पाय, पाठीवर मारहाण झाल्याने विनित गंभीर जखमी झाला. या प्रकार विद्यार्थ्याने आपली आई किर्ती तारी यांना सांगितल्यावर त्यांनी या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधीत शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. शिक्षक नितेश प्रधान याला पोलीसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली आहे. दरम्यान विद्यार्थी विनित याच्यावर रुग्णालयात उपचार करुन त्याला घरी सोडण्यात आले.