धक्कादायक! प्राध्यापकाने केलेले लैंगिक अत्याचार विद्यार्थीनीने त्याच्या पत्नीला सांगितले, ती म्हणाली मलाही मान्य...

By राम शिनगारे | Published: April 25, 2023 10:41 PM2023-04-25T22:41:07+5:302023-04-25T22:41:17+5:30

बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल : विद्यापीठाच्या एका विभागातील प्रकार, पत्नीच विद्यार्थिनीला वारंवार त्याच्यासोबत बेडरूममध्ये पाठवायला लागली.

Shocking! Professor husband and wife sexually harassed the student in Chatrapati Sambhajinagar University | धक्कादायक! प्राध्यापकाने केलेले लैंगिक अत्याचार विद्यार्थीनीने त्याच्या पत्नीला सांगितले, ती म्हणाली मलाही मान्य...

धक्कादायक! प्राध्यापकाने केलेले लैंगिक अत्याचार विद्यार्थीनीने त्याच्या पत्नीला सांगितले, ती म्हणाली मलाही मान्य...

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एका विभागातील प्राध्यापकासह त्याच्या पत्नीच्या विरोधात विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचा गुन्हा बेगमपुरा पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री १० वाजता नोंदविण्यात आला. आरोपींमध्ये डॉ. अशोक गुराप्पा बंडगर व त्याची पत्नी पल्लवी अशोक बंडगर (रा. विद्युत कॉलनी, बेगमपुरा) यांचा समावेश असल्याची माहिती बेगमपुरा पोलिसांनी दिली.

विद्यापीठातील एका विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीनी दिलेल्या फिर्यादीनुसार शासकीय कला महाविद्यालयात २०१९ ते २०२१ मध्ये शिक्षण घेत असताना तृतीय सत्रात सर्व्हिस कोर्ससाठी एका विषयाची निवड केली होती. त्या विषयाची शिकवणी डॉ. बंडगर हा ऑनलाईन पद्धतीने घेत होता. तेव्हा पीडितेची त्याच्यासोबत ओळख झाली. चौथ्या सत्रात लघुप्रबंध सादर करण्यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये पीडितेने बंडगरचे मार्गदर्शन घेतले होते. त्यानंतर पीडितेने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे, असा सल्ला घेतला. तेव्हा बंडगर याने विद्यापीठातील एका विभागात प्रवेश मिळवून दिला. त्याचवेळी चित्रपटात काम करण्याचेही अमिष दाखवले. विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर राहण्यासाठी पीडिता शहरात आल्यानंतर तिला वसतिगृहाऐवजी स्वत:च्या घरीच पेईंग गेस्ट म्हणून राहण्यास घेऊन गेले.

घरी त्याच्या पत्नीनेही मुलीसारखी काळजी घेण्याचे आश्वासन दिले. जुन २०२२ मध्ये बंडगरने अनेकवेळा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. जुलै २०२२ मध्ये पहाटे हॉलमध्ये पीडिता झोपली असताना बंडगरने बळजबरीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पाच ते सहा वेळा जबरदस्तीने शारीरिक संंबंध ठेवले. जानेवारी २०२३ मध्ये हा सर्व प्रकार बंडगरच्या पत्नीस सांगितला. तेव्हा तिने सर्व मला मान्य आहे. तू आता घर सोडून जाऊ नकोस. माझ्या पतीसोबतच लग्न कर, मला दोन मुली आहेत. आम्हाला मुलगा नाही. तुझ्यापासून आम्हाला एक मुलगा हवा असल्याचेही सांगितले. त्यानंतर बंडगरची पत्नीच विद्यार्थिनीला वारंवार त्याच्यासोबत बेडरूममध्ये पाठवत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Shocking! Professor husband and wife sexually harassed the student in Chatrapati Sambhajinagar University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.