धक्कादायक ! फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; वडगाव मावळ येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 12:43 PM2020-11-03T12:43:09+5:302020-11-03T12:44:04+5:30

वडगाव येथील भारत पेट्रोल पंपावरील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली.

Shocking! Rape of a minor girl by threatening to make the photo viral; incident in the Vadgaon maval | धक्कादायक ! फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; वडगाव मावळ येथील घटना 

धक्कादायक ! फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; वडगाव मावळ येथील घटना 

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपींना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे वडगाव न्यायालयाचे आदेश

वडगाव मावळ : एका अल्पवयीन मुलीचे फोटो काढून ते व्हायरल करण्याचा धाक दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी वडगाव येथील भारत पेट्रोल पंपावरील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. याप्रकरणी मुलीच्या आईने वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे 

गणेश कृष्णा भोसले व राजू उर्फ राजकुमार आनंदराव मामीलवाड दोघेही (रा. वडगाव मावळ )अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वडगाव न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व तिची आई अशा दोघेही वडगाव येथील भारत पेट्रोल पंपावर कामाला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी मुलगी कामाला गेल्यावर रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. त्यानंतर नातेवाईकांनी पेट्रोल पंपावर चौकशी केली असता ती काम करून गेल्याचे सांगण्यात आले. पण ती घरी न आल्याने हरवल्याची तक्रार देण्यासाठी नातेवाईक वडगाव पोलिस ठाण्यात गेले. त्यांना मुलगी तळेगाव येथे असल्याचे समजले. घरी आणल्यानंतर आईने विश्वासात घेऊन मुलीला विचारणा केली. यावेळी मुलीने सांगितले की, पेट्रोल पंपावरील गणेश भोसले याने १० ऑगस्ट रोजी तिच्यासोबत प्रेम असल्याचे सांगून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पाच वेळा बलात्कार केला. १६ ऑक्टोबर रोजी गणेशचा मित्र राजू याने मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. पुढील तपास वडगाव पोलिस करीत आहे.

Web Title: Shocking! Rape of a minor girl by threatening to make the photo viral; incident in the Vadgaon maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.