धक्कादायक...जगभरात एअर हॉस्टेसचे अश्लिल फोटो होत आहेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 12:39 PM2019-08-13T12:39:30+5:302019-08-13T12:42:27+5:30
जपानमध्ये वारंवार एअर हॉस्टेसनी तक्रारी केल्या होत्या. ज्यामध्ये खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत.
नवी दिल्ली : विमान प्रवासावेळी प्रवाशांकडून चोरून एअर हॉस्टेसचे व्हिडिओ, अश्लिल फोटो काढण्याचे धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. लपविलेल्या कॅमेरामधून किंवा मोबाईलद्वारे खेचल्या गेलेल्या या फोटो, व्हिडिओंना इंटरनेटवर व्हायरल केले जात आहे. महत्वाचे म्हणजे हे कॅमेरे महिला प्रवाशांसाठीही धोकादायक ठरू शकतात.
हा प्रकार पहिल्यांदाच केल्या गेलेल्या सर्व्हेतून समोर आला आहे. जपानमध्ये वारंवार एअर हॉस्टेसनी तक्रारी केल्या होत्या. ज्यामध्ये खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत. जपानी एअर हॉस्टेसच्या तक्रारींवरून जपानी फेडरेशनन ऑफ एव्हीएशन इंडस्ट्री युनियनने हा सर्व्हे केला आहे.
ही संस्था टोकियोयेथील कामगार संघटना आहे, जी हवाई क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी काम करते. संस्थेने या प्रकरणी एप्रिल ते जून 2019 मध्ये सर्व्हे केला. यामध्ये जपानी एअरवेजच्या 60 टक्के एअर हॉस्टेसची चोरून आपत्तीजनक फोटो किंवा व्हिडिओ बनविण्यात आल्याचे समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे हा प्रकार विमान प्रवासावेळी घडला आहे.
एका एअरहॉस्टेसने सांगितले की, एक प्रवाशाने त्याच्या मौज्यांमध्ये कॅमेरा लपविला होता. त्याला पकडल्यावर त्याच्या कॅमेरामध्ये अशाप्रकारे अनेक एअर हॉस्टेसचे फोटो, व्हिडीओ काढण्यात आले होते. या 60 पैकी केवळ 40 टक्केच एअर हॉस्टेसनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनीही यावर मोठी करवाई न करता त्यांना तंबी देऊन सोडून दिले आहे.
ब्लॅकमेलचे प्रकार
एअर हॉस्टेसने पकडल्यानंतर त्याचा मोबाईल तपासणीसाठी मागितला जातो. मात्र, प्रवासी बहुंतांशवेळा विरोध करतात. तसेच बळजबरी केल्यास या वर्तनाची तक्रार सोशल मिडीयावर करण्याची धमकी देतात. अनेकदा एअर हॉस्टेसना अपमानजनक वक्तव्येही ऐकावी लागतात.