अमानवीय! डॉक्टरने कुत्र्यावर केला रेप, शेजारच्या महिलेने रंगेहाथ पकडलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 13:48 IST2021-06-30T13:46:51+5:302021-06-30T13:48:46+5:30
ही घटना कोलकाताच्या रीजेंट पार्क भागात मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेची माहिती समोर येताच सगळेच हैराण झाले.

अमानवीय! डॉक्टरने कुत्र्यावर केला रेप, शेजारच्या महिलेने रंगेहाथ पकडलं...
(प्रातिनिधीक छायाचित्र)
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका डॉक्टरने कुत्र्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेपचा आरोपी एका आयुर्वेदिक डॉक्टराविरोधात रीजेंट पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना कोलकाताच्या रीजेंट पार्क भागात मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेची माहिती समोर येताच सगळेच हैराण झाले. एका डॉक्टर एका मुक्या जनावरासोबत असं कृत्य कसं करू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडला. याच भागात राहणाऱ्या एका महिलेने १०० नंबरवर कॉल करत लालबाजार पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपी डॉक्टरचं वय ६० वर्षे सांगितलं जात आहे आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. आरोपी डॉक्टर अरविंद पार्कमध्ये आपल्या बहिणीच्या घरी आपल्या पत्नीसोबत राहत होता. तो स्वत: एक आयुर्वेदिक डॉक्टर असल्याचं सांगत होता.
तक्रारदार महिलेने सांगितलं की, शेजारच्या घरात राहणाऱ्या एक डॉगीला खायला देण्याच्या बहाण्याने आरोपी डॉक्टरने त्याला घरात नेलं. थोड्या वेळाने त्या कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज येत होता. शेजारी महिलेने जाऊन पाहिलं तर कुत्र्याच्या गुप्तांगातून रक्त येत होतं. तेव्हा डॉक्टरच्या या घाणेरड्या कृत्याचा पर्दाफाश झाला.
त्यानंतर महिलेने लालबाजार पोलीस स्टेशनमध्ये लगेच फोन करत या घटनेची माहिती दिली. महिलेने सांगितलं की, पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर रीजेंट पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी जास्त माहिती देण्यास नकार दिला आहे.